१० वी पुणे जिल्हा सिलंबम चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात संपन्न; एन.ई.एम.एस शाळेच्या विद्यार्थ्यांची पदकांची दमदार कामगिरी

शिक्षण विवेक    19-Aug-2026
Total Views |
des
पुणे : १६ ऑगस्ट २०२६ रोजी
सह्याद्री छावा सिलंबम असोसिएशन पुणे, यांच्या वतीने महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन व ऑल इंडिया सिलंबम फेडरेशनशी संलग्न १० वी पुणे जिल्हा सिलंबम चॅम्पियनशिप २०२६* ही स्पर्धा नवीन मराठी शाळेच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन *शनिवार पेठ विभागातील नगरसेविका मा.सौ. गायत्रीताई खडके* यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रमुख पाहुण्या म्हणून *मा. सौ. स्मिताताई वस्ते* यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत पुणे शहर व परिसरातील विविध शाळांमधून *जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी* उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
एन.ई. एम. एस शाळेतील तब्बल १२५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले.विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १३ गोल्ड, १४ सिल्व्हर आणि ४६ ब्राँझ* पदके मिळवून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
विद्यार्थिनींनी अत्यंत शानदार कामगिरी करत *१ गोल्ड, ८ सिल्व्हर आणि ५५ ब्राँझ* पदके पटकावली. विशेष म्हणजे, *मुलींच्या गटात सर्वाधिक पदके जिंकत एन.ई.एम.एस च्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला आणि प्रथम क्रमांकाची मानाची ट्रॉफी आपल्या नावे केली.*विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे संपूर्ण शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
सह्याद्री छावा सिलंबम असोसिएशन चे प्रमुख *मा. कचाले सर* यांच्या हस्ते एन.ई.एम.एस शाळेच्या मुख्याध्यापिका *श्रीमती हेमांगी देशमुख, क्रीडा शिक्षक प्रमोद उकिर्डे,देविदास वाकळे तसेच शाळेच्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका *श्रीमती हेमांगी देशमुख* यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना व कचाले सरांच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या कौतुक सोहळ्याला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. आपल्या पाल्यांच्या यशाचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. कचाले सर आणि त्यांची टीम तसेच एन.ई.एम.एस शाळेचे क्रीडा शिक्षक प्रमोद उकिर्डे आणि देविदास वाकळे यांनी अथक परिश्रम घेतले.