पुणे: आज दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी टिळक मार्ग येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस.सी.बोर्ड परीक्षा, मार्च २०२६मध्ये शाळेत प्रथम क्रमांक मिळविणारी विद्यार्थिनी सान्वी होळकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शरद कुंटे,शाला समिती अध्यक्षा राजश्री ठकार, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी,उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी,पर्यवेक्षिका राधा केतकर, ग्रेसी डिसूजा, सिमरन गुजर, काजल चौधरी, पालक संघ, शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी, उपस्थित होते.
कार्यक्रमात शालेय प्रार्थना, बँड पथक संचलन, छात्र प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, राज्यगीत, वंदे मातरम् गीत, झेंडा गीत, सार्वभौम प्रार्थना, देशभक्ती गीते,नृत्य, नाटकाचा समावेश होता. राष्ट्रभक्तीपर गीत नृत्याविष्कारात लहान मुलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक सकाळ व दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेने देशभक्ती, पर्यावरणाचा संदेश व ‘स्वच्छ भारत’ यावर आधारित गीत, नृत्याविष्कार सादर केले. माध्यमिक शाळेने ‘काकोरी’ सरकारी खजिना लुटीचा प्रसंग नाटकातून सादर केला.
शरद कुंटे यांनी मार्गदर्शनपर भाषणात ‘स्मार्ट’ विद्यार्थी या संकल्पनेवर भर दिला. अवतीभोवती घडत असलेली चांगली वाईट परिस्थिती लक्षात घेऊन कृतिशीलतेने चांगली परिस्थिती निर्माण करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सान्वी होळकर हिने स्वातंत्र्य, देशभक्तीचे विचार प्रकट केले.भाषणात
शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन गिरीजा कदम, हिमानी देसाई यांनी केले. काजल चौधरी यांनी आभार मानले.डी.ई.एस.शाळेतील संगीत शिक्षिका, शारीरिक शिक्षक,शिक्षिका यांनी कार्यक्रमांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य दिनाच्या यशस्वीतेसाठी डी.ई.एस.शाळेतील मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनात उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, टिळक मार्ग, पुणे ३०