विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण सत्राचे आयोजन

शिक्षण विवेक    19-Aug-2026
Total Views |
des
 
पुणे,दि.१७ ऑगस्ट : विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने प्रथमोपचार करता यावा, या उद्देशाने शनिवार पेठेतील एन.ई.एम.एस शाळेत इयत्ता ४ थी ते ७ वी च्या दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात *स्काऊट गाईड स्थानिक संस्थेच्या चिटणीस* पदावर कार्यरत असणाऱ्या व डी.ई.एस माध्यमिक शाळेच्या गाईड कॅप्टन म्हणून कार्यरत असणाऱ्या *सौ.सुनेत्रा वेदपाठक* यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक वस्तू व त्याचा उपयोग समजावून सांगितला.प्रथमोपचाराचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी मैदानावर खेळताना झालेली किरकोळ जखम,भाजणे, रक्तस्राव, चक्कर येणे, हात पाय मुरगळणे, डोक्याला मार लागणे तसेच इतर आपत्कालीन प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, काय प्राथमिक उपचार करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रथमोपचाराच्या विविध पद्धतीही शिकविण्यात आल्या.ह्या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन प्रसंगी प्रसंगावधान राखून योग्य ती मदत करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी ह्या सत्राचे आयोजन केले.