शिक्षकाचे मनोगत

शिक्षण विवेक    24-Aug-2026
Total Views |
 
csm
 
स्व-हितगुज
काल शाळा सुटल्यावर घरी जात असताना एका चाळीतून जात होतो, अचानक एका महिलेचा आणि एका तरुण मुलीचा या दोन्ही शेजाऱ्यांचा संवाद कानावर पडला.
"अहो काकू, तुमचा जरा हॉटस्पॉट द्या ना!!"
काकू ने रिप्लाय दिला.
"हो घे ना पण पंधरा मिनिटाचे पैसे लागतील बर का!!!"
अर्थातच काकू मुद्दामूनच बोलल्या, पण यावरून असे लक्षात आले की खरोखर आपण आधुनिक काळात जगत आहोत. संगणक तंत्रज्ञान आता AI पर्यंत आलेले आहे.
आणि कदाचित आमची पिढी संपल्यावर पुढच्या पिढीत नक्की General AI चा अवतार उतरणार आहे, अर्थात प्रत्यक्ष आपल्या कामात मदत करणारा एक रोबोट.
पूर्वीच्या काळी शेजार धर्म म्हणून आपण एक वाटी साखर, किंवा एक कप दूध असे मागत होतो, आता तो काळ मागे पडलेला आहे. तुमचे हॉटस्पॉट द्या, मला व्हाट्सअप करा, व्हिडिओ कॉल करा असे शब्द कानावर पडतात.
एक सर्वसामान्य माणूस म्हणून या गोष्टी पाहिल्यावर खूप आनंद होत आहे की आज विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माणसाची प्रचंड प्रगती होत आहे.
पण एक शिक्षक आणि भारताचा एक नागरिक म्हणून मी जेव्हा AI चा विचार करतो, तेव्हा मला AI कडून पुढील गोष्टींची खूप अपेक्षा आहे.
1. या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील लोकशाही पद्धतीला पोषक वातावरण निर्माण व्हावे.
2. भारताची निवडणूक यंत्रणा AI च्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक व्हावी.
3. भारत देशातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा अत्यंत पारदर्शकता यावी.
4. प्रत्येक क्षेत्रात AI च्या साह्याने असे डिवाइस तयार करावे की कुठेही भ्रष्टाचार होणार नाही.
5. एखादा जनतेचा लोकप्रतिनिधी निवडून येतो तेव्हा जोपर्यंत तो त्याच्या पदावर आहे त्याच्या संपूर्ण कार्याची त्याच्या संपत्तीची माहिती AI च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावी.
6. त्यामुळे AI च्या भीतीने कोणीही भ्रष्टाचार करणार नाही.
7. या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील प्रत्येक न्यायालयात प्रलंबित असलेले कोट्यावधी खटले लवकरात लवकर निकालात काढावे.
8. शासन आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्तीवर AI च्या माध्यमातून लक्ष असावे.
9. भविष्यात AI म्हणजे आपल्या स्वप्नातील प्रभू श्रीरामचंद्रांचे राम राज्य ही संकल्पना पुन्हा साकार व्हावी, हीच सदिच्छा. आणि शेवटचे अत्यंत महत्त्वाचे..
10. शासकीय आणि खाजगी सेवा किंवा रोजगार देताना ए आय च्या मदतीने योग्य उमेदवाराला न्याय मिळावा.
वरील सर्व मुद्दे हे अर्थातच माझ्या स्वप्नातील मुद्दे आहेत. देशावर प्रेम करणा-या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात हेच विचार असतील याबद्दल मला काही शंका वाटत नाही.
जय हिंद ! जय भारत !! जय संविधान !!!
 
_ Tr Bhimrao Zalte
शाळा विद्यामंदिर मांडा टिटवाळा