म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश!

शिक्षण विवेक    24-Aug-2026
Total Views |
mes
 
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश! 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) २०२५-२६ मध्ये म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेत शाळेचे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
🌟 गुणवंत विद्यार्थी
🔹 सार्थक दत्तु खाडे — २४२ गुण
➡️ जिल्ह्यात १५५ वा क्रमांक
🔹 यश रघुनाथ कदम — २३८ गुण
➡️ जिल्ह्यात १९१ वा क्रमांक
🔹 स्वरांजली योगेश जाधव — २३६ गुण
➡️ जिल्ह्यात २०८ वा क्रमांक
🔹 वेदांत सचिन इंदलकर — २३६ गुण
➡️ जिल्ह्यात २१९ वा क्रमांक
या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, पालकांचे सहकार्य तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. या सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले होते .
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे, माननीय उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार, शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे ,सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे अभिनंदन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक मार्गदर्शनाचे प्रतीक आहे.
💐 सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन! 💐