म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिक्षण विवेक    24-Aug-2026
Total Views |
mes
 
भावे प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर, पालक व उपस्थितांचे स्वागत करून झाली.
प्रमुख पाहुणे श्री. डॉ. निलेश दरवडे (माजी विद्यार्थी, ऑर्थोपेडिक सर्जन, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे , मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे, उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार तसेच शिक्षक, पालक आणि आजी - माजी विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी ध्वज प्रणाम, राष्ट्रगीत, ध्वजगीत ,कौमी नारे व समूहगीत सादर केले. शाळेत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट क्रांतिसप्ताह साजरा करण्यात आला .यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ‘क्रांतिकारक’ या हस्तलिखिताचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या हस्तलिखितातून विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या शौर्याची ओळख करून दिली.
विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकाची गोष्ट सांगितली व भूमिगत क्रांतिकारक यांची वेशभूषा अभिरूप स्वरूपात केली होती . विद्यार्थ्यांनी इंग्रजी संवाद प्रभावीपणे सादर केला. ‘धान्य दान’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वनवासी कल्याण आश्रमाला तांदूळ देऊन सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्याच्या तालावर पॉम-पॉम हातात घेऊन सादरीकरण केले . तसेच विविध कवायत प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मंथन परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, देशप्रेम, शिस्त आणि राष्ट्राप्रती कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.