दिनांक 8 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी कै. वि. मो. मेहता माध्यमिक प्रशालेत बी आर जोशी क्रॉस कंट्री स्पर्धा /मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगर पालिका सभागृह नेते माननीय श्री नरेंद्र काळे, तसेच दिव्य मराठीचे संपादक माननीय श्रीयुत महेश रामदासी, शिक्षण प्रसारक नियामक मंडळीचे सदस्य माननीय श्रीयुत सुरेश बाबु मंकणी सर त्यांच्या पत्नी सौ. माननीय एडवोकेट निता मंकणी मॅडम तसेच शिक्षण प्रसारक मंडळीचे सदस्य माननीय श्री राघव अष्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ प्रतिमा स्वामी यांनी विद्यार्थ्यांकडून वॉर्मप एक्सरसाइज करून घेतला. क्रीडा ज्योत लावून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली इयत्ता सातवी आठवी, पाचवी सहावी, तिसरी व चौथी तसेच पहिली व दुसरी अशा विविध गटातील मुला मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला
विद्यार्थ्यांनी विविध मार्गांवर उत्साहाने धावत स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचा उत्साह, जिद्द आणि खेळाडू वृत्ती यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले.
मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री विष्णू गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेवाडी यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री. अमित कोर्टीकर यांनी केले तर आभार श्रीयुत बाळकृष्ण पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालकांनी व शिक्षकांनी स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी मुलांच्या पहिली व दुसरी गटातून चिरंजीव श्रेयांश शार्दुल कुलकर्णी प्रथम, चिरंजीव वेदांत विजय आदलिंग द्वितीय, चिरंजीव वीरांश विश्वजीत सर्वदे तृतीय.
तिसरी चौथी गटातून चिरंजीव विराज कपिल कोकरे प्रथम, चिरंजीव शौर्य संतोष कलकामकर द्वितीय,चिरंजीव प्रियांश प्रशांत सिंदकर तृतीय.
पाचवी सहावी गटातून चिरंजीव शिवम संतोष कलकामकर प्रथम, चिरंजीव आदिराज ज्ञानेश्वर पाटील द्वितीय, चिरंजीव श्लोक गिरीश लोंढे तृतीय.
सातवी आठवी गटातून चिरंजीव अथर्व सातप्पा कोरे प्रथम,चिरंजीव वीर चंद्रकांत घोडके द्वितीय, चिरंजीव स्वराज शक्तीश्वर शिंदे तृतीय.
मुलींच्या पहिली व दुसरी गटातून कुमारी आरोही सचिन पुकाळे प्रथम, कुमारी ईश्वरी सागरसिंग मरुड द्वितीय, कुमारी शांभवी मारुती सांगळे तृतीय.
तिसरी व चौथी गटातून कुमारी आर्या विवेकानंद तुपे प्रथम क्रमांक,कुमारी अमृता मल्लिकार्जुन मोर्डे द्वितीय क्रमांक, कुमारी सानवी रमेश बिराजदार तृतीय क्रमांक.
मुलींच्या पाचवी सहावी गटातून कुमारी अद्विका प्रवीण देशमुख प्रथम क्रमांक, कुमारी हिंदवी विष्णू गायकवाड द्वितीय क्रमांक, कुमारी शाश्वती कीर्ती कुमार वेळापुरे तृतीय क्रमांक.
सातवी आठवी गटातून कुमारी श्रुती शिवानंद गुदोडगी प्रथम क्रमांक, कुमारी आराध्या सिद्धेश्वर तारापूरे द्वितीय क्रमांक,कुमारी स्वस्तिका लक्ष्मीकांत बेद्रे तृतीय क्रमांक.
याप्रमाणे मुलांच्या व मुलींच्या गटातून सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या स्पर्धेचे पंच म्हणून श्री. सूर्याजी लिंगडे व श्री. दशरथ गुरव यांनी काम पहिले.