‘मेहता प्रशालेत’ डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रंथालय दिन’ उत्साहात साजरा!

शिक्षण विवेक    25-Aug-2026
Total Views |
spm
‘मेहता प्रशालेमध्ये’ भारतीय ग्रंथशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रंथालय दिन’ अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रुती बागेवाडी, पर्यवेक्षिका सौ. मीनाक्षी भाटवडेकर तसेच शाळा समिती सदस्य श्री. सुरेश बाबु मंकणी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत व सन्मान केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विविध पुस्तकांविषयी माहिती मांडली.
कु. प्रगती पवार हिने डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. कु. यशस्वी आरेकर हिने आरोग्यविषयक पुस्तकांची, तर कु. वेदिका अंकलगीकर हिने ‘आपली संस्कृती व अभिमान’ या विषयावर विचार मांडले. कु. स्वरा कोळी व कु. आराध्या माळी यांनी प्रसिद्ध लेखकांची माहिती दिली, तर कु. राणी हडपद व चि. शौर्य ताठे यांनी ‘अमृतवेल’ या कादंबरीचा परिचय करून दिला. चि. राजवीर गवळी याने ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकातील विनोदी संवाद सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. चि. श्रेयस इरलापल्ले याने लोकप्रिय कवींच्या कवितांचा परिचय करून दिला.
आपल्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका सौ. श्रुती बागेवाडी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, ग्रंथालयाचा उपयोग आणि डॉ. रंगनाथन यांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी शाळा समिती सदस्य श्री. सुरेश बाबु मंकणी, ग्रंथपाल श्री. अनंत दिवाणजी , ग्रंथालय समितीच्या सौ. यशस्विनी कुलकर्णी, सौ. प्रीती कुलकर्णी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार चि. श्रेयश पवार याने मानले.