पुणे : शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत श्रावणी शुक्रवार उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी व्यावसायिक, मानसशास्त्रज्ञ व इतिहासाच्या अभ्यासक विद्याताई गद्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका हेमा जाधव,ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि जिवतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गणपती व देवीची आरती करण्यात आली.
मुख्याध्यापिका हेमा जाधव आणि प्रमुख अतिथी विद्याताई गद्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांना औक्षण केले.
"श्रावण महिना हा निसर्गासोबत जवळीक साधण्याचा महिना असून निसर्गाचा उत्सव आहे,निसर्ग, पर्यावरण रक्षणाचे अनेक उपक्रम शाळेत राबवले जातात."असे यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी सांगितले.
शिक्षिका अर्चना देव यांनी श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगून श्रमप्रतिष्ठा, विद्या अध्ययन याचे महत्त्व सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त शिकवणाऱ्या बालविरांच्या स्वस्तिक पथकाचा शपथविधी यावेळी पार पडला.
मीनल कचरे यांनी स्वयम शिस्तीचे महत्व आणि स्वस्तिक पथकातील विद्यार्थ्यांची कामे समजावून सांगितली.
स्वप्ना वाबळे यांनी पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पत्रीचे आयुर्वेदातील महत्त्व सांगितले.
प्रमुख अतिथी नेहा गद्रे यांनी शाळेतील गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत केली आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गायत्री बेलसरे यांनी सूत्रसंचालन केले. योगिता भावकर यांनी आभार मानले. प्रकाश राऊत, शितल जाधव यांनी आयोजन सहाय्य केले. सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून फुटाणे देण्यात आले.