रेणावीकर विद्यामंदिर शाळेने पटकावला रोटरी क्लब आयोजित समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक

शिक्षण विवेक    25-Aug-2026
Total Views |
mes
रोटरी क्लब प्रियदर्शनी आयोजित आंतर शालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत म.ए.सो.च्या रेणावीकर विद्यामंदिर शाळेने प्रथम क्रमांक आणि रोख 5000/- रुपयांचे पारितोषिक पटकावले..
"आओ बच्चो तुम्हे दिखाये" हे गाणे विद्यार्थ्यांनी सादर केले...
अतिशय तालासुरात व तल्लीन होऊन विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले त्यामुळे शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला..
आपल्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांची देखील मने जिंकली... संपूर्ण प्रेक्षागृह विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने भारावून गेले..
देश प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या एक से बढकर एक गीतांनी संपूर्ण स्पर्धेचा माहोल अतिशय संगीतमय झाला होता...
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे संगीत शिक्षक श्री कल्पेश अदवंत सर , तसेच सौ.प्रज्ञा झरेकर, सौ.स्वाती गराडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड मॅडम यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले. शाळेतर्फे सततच अशा कलाविषयक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते..
स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी तर्फे दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील नगरमधील अनेक शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला...
अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे...