शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम,निगडी शाळेतील विद्यार्थ्यांना समर्थ रामदास स्वामी मराठी चित्रपट दाखविण्यात आला.

शिक्षण विवेक    26-Aug-2026
Total Views |
spm
 
दि. 24 ऑगस्ट 2026 वार - मंगळवार रोजी शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम,निगडी शाळेतील इयत्ता 2 री ते 10 वी तील विद्यार्थ्यांना आयनॉक्स जय गणेश व्हिजन आकुर्डी, पुणे या ठिकाणी समर्थ हा समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी मराठी चित्रपट दाखविण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, शिस्त व समर्थ विचार रुजावेत हा उद्देश शाळेचा होता.
शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी चित्रपट सुरु होण्याच्या सुरुवातीला समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक चित्रपटगृहात म्हणाले*. यामुळे सुरुवातीलाच सर्व वातावरण अतिशय प्रसन्न झाले.
शाळा समिती अध्यक्ष  ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर सर प्रेरणेतून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या सहकार्याने एकूण 600 विद्यार्थ्यांनी अतिशय प्रेरणादायी , प्रसन्न वातावरणात चित्रपटाचा आनंद लुटला.