म. ए सो. बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड, पुणे शाळेतील विद्यार्थ्यांनी सीमेवरिल सैनिका साठी शुभेच्छा पत्र व राख्या तयार केल्या.

शिक्षण विवेक    27-Aug-2026
Total Views |
mes
शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिकाताई खेडलेकर बाईंनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सीमेवरील जवानांचे महत्त्व व रक्षाबंधनाचे महत्व सोप्या शब्दात सांगितले.
इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या सैनिकांप्रती असणारे प्रेम,जवानांप्रती असणारा आदर, कृतज्ञता पत्रातून व्यक्त केल्या. आणि आपल्या आवडत्या सैनिकांसाठी छान राख्या मनापासून तयार केल्या. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व
मातृ शक्ती संघटनेच्या चारूलता काळे व अस्मिता अग्निहोत्री यांनी देखील विद्यार्थ्यांनी कमी वेळेत 400 राख्या केल्याबद्दल विदयार्थ्यां चे कौतुक केले.
*जय हिंद! जय भारत!*