आशिष चांदोरकर आंतर शालेय नाट्य वाचन स्पर्धेत म.ए.सो. च्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना या शाळेला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.

शिक्षण विवेक    27-Aug-2026
Total Views |
mes
 
आशिष चांदोरकर आंतर शालेय नाट्य वाचन स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना या शाळेला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.
शनिवार दिनांक 22/8/2026 रोजी म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा येथे आंतर शालेय नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये म. ए. सो.बाल शिक्षण मंदिर या शाळेने घवघवीत यश प्राप्त केले आहे. या संघातील उत्कृष्ट वाचक म्हणून इयत्ता चौथीतील कृष्णाई घैसास हिला मेडल प्राप्त झाले.संपूर्ण स्पर्धेतील एकूण 13 संघातून इयत्ता चौथीतील अथर्व सातव याला सर्वोत्कृष्ट वाचक साठी ट्रॉफी हे पारितोषिक मिळाले आहे.
तसेच उत्कृष्ट संहिता लेखक म्हणून श्रीमती. भाग्यश्री हिरास व सौ. तनुजा सोनपाटकी यांना ट्रॉफी आणि स्पर्धेमध्ये *एकूणात शाळेला द्वितीय क्रमांकाचे* पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेत इयत्ता चौथीचे अथर्व सातव,
कृष्णाई घैसास,ओवी बलकवडे,अमुल्या मोडक,
श्लोक चव्हाण,आयान सय्यद हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
नाट्य वाचनासाठी पिशवी 
या विषयावर अतिशय नाविन्यबद्ध पद्धतीने, कल्पकतेने संहिता लिहिण्यात आली.
सर्व संस्थापदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापिका मोनिका खेडलेकर , पालक शिक्षक व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन अभिनंदन!