म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा व मातृपूजन सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षण विवेक    03-Aug-2026
Total Views |

mes
 
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमा व मातृपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व मा. उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते आद्य गुरु महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरु परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे औक्षण करून मातृपूजन केले. "आई हीच आपली पहिली गुरु" हा संस्कारमूल्यांचा संदेश या प्रसंगी प्रभावीपणे देण्यात आला. त्यानंतर गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांच्या गोष्टी व गाणी सादर केली .
यानंतर विद्यार्थ्यांनी पौराणिक व आधुनिक गुरु-शिष्य जोड्यांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पूजन करून त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते आकर्षक भेटकार्डे तयार करून ती आपल्या आईला व शिक्षकांना प्रेमपूर्वक भेट दिली. तसेच आई व शिक्षकांविषयी आपल्या मनातील कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करणारी भावनिक पत्रे लिहिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पत्रांचे व भेटकार्डांचे सुंदर प्रदर्शन भरविण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थित पालक, मान्यवर व शिक्षकांनी विशेष कौतुक केले.
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व मा. उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे तसेच उपक्रमांमधून व्यक्त झालेल्या संस्कारमूल्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुभक्ती, मातृभक्ती, गुरुजनांप्रती आदरभाव आणि कृतज्ञतेची भावना जागविणारा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली