म .ए .सो.भावे प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी .

शिक्षण विवेक    03-Aug-2026
Total Views |

mes
 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे, माननीय उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार , योगशिक्षक श्री. मनोज साळी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर शिक्षकांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, समाजप्रबोधनातील योगदानाचा व देशासाठी केलेल्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील प्रेरणादायी गोष्टींचे नाट्यरूप सादरीकरण तसेच जोशपूर्ण पोवाड्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. योगशिक्षक श्री. मनोज साळी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, नियमित योगाभ्यास आणि व्यायामाचे महत्त्व समजावून सांगत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श घेऊन प्रामाणिकपणा, परिश्रम, देशप्रेम आणि समाजसेवेची मूल्ये जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.
शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्रा डॉ. मानसी भाटे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले