शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त या दोन्हीही नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन शालेय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याची ठिणगी लोकांच्या मनात आपल्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांतून तसेच सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्या माध्यमातून कशी तेवती ठेवली याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका आशा माने यांनी केले.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून कसा समाज जागृत केला आणि मुंबई ही महाराष्ट्रात कशी राहील यासंदर्भात लढा दिला हे आपल्या भाषणातून मुख्याध्यापकांनी यावेळी सांगितलं.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी श्री मल्हारी रोकडे यांनी चिंतन सादर केले आणि लोकमान्य टिळकांविषयीचे चिंतन श्रीमती प्रीती सोरटे यांनी सादर केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी 'महाराष्ट्रावरुन टाक ओवाळून काया' हा पोवाडा सादर केला, त्या विद्यार्थ्यांना श्रीम. वैशाली भोकरे यांनी मार्गदर्शन केले होते.वक्तृत्व विभाग प्रमुख सुनीता खरात यांनी वक्तृत्व सप्ताहाविषयी माहिती सांगितली.यावेळी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची भाषणे झाली आणि त्या विद्यार्थ्यांना उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देवळणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रज्ञा करडखेडकर यांनी केले.