मानवी आयुष्यामध्ये खेळाला खूप महत्त्व आहे.भारताचे प्रसिद्ध हॉकीपटू, हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे *मेजर ध्यानचंद* यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट, हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सीलंबम या खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मा.श्री.किरण आढागळे सर व मा. श्री. गणेश गेजगे सर, शाळा समिती अध्यक्ष मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर सर शाळेच्या मा. मुख्यध्यापिका मा. सौ. सविता बिराजदार याच्या हस्ते दीप प्रज्वलनाने,मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून, तसेच बलोपासनेची देवता हनुमान यांच्या प्रतिष्ठापना करून करण्यात आली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका सौ. शीतल महांकाळे यांनी *क्रीडा प्रतिज्ञा* दिली.
क्रीडा दिनाच्या औचित्य साधत मा. किरण आढागळे सर व त्यांचे सर्व सहकारी यांनी *भारतीय क्रीडा प्रकारांचे जसे की गतका, लाठी -काठी, सेल्फ डिफेन्स, कलेरू पेटू, लाठी - काठी , मर्दानी खेळ, सिलंबम* याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर केले.
शाळा समिती अध्यक्ष मा.ॲड .प्रा.डॉ.राघव अष्टेकर सर यांनी आपल्या मार्गदर्शनाद्वारे मानवी जीवनात असलेले भारतीय खेळाचे महत्व, तसेच शारीरिक क्षमता विकसित होण्यासाठी व निरोगी आरोग्य राखण्यासाठी आपल्या आयुष्यात मैदानी खेळांचे महत्त्व व मेजर ध्यानचंद यांच्या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच बलोपासनेची देवता हनुमान यांची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना शरीर बल वाढवण्यासाठी व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील क्रीडा शिक्षक श्री.शिवाजी बांदल यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षिका सौ.शितल महांकाळे यांनी केले.
शाळा समिती अध्यक्ष मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर सर यांच्या प्रेरणेतून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ.सविता बिराजदार,यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सकाळी शाळेच्या प्रांगणात अतिशय आनंददायी वातावरणात क्रीडा दिन संपन्न झाला.