ज्ञानाचा प्रकाश देण्या---
दिवा अखंड जळतो!
जीवनाचा खरा अर्थ
शिक्षकांमुळेच कळतो.
मंगळवार दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी बाल शिक्षण मंदिर शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा.मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बाईंनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापनाचा आनंद घेतला.
रोजच्या प्रमाणे परिपाठासाठी मुले जमली मात्र आज पूर्ण परिपाठ शिक्षक रुपी विद्यार्थ्यांनी घेतला. चौथीतील कृष्णाई घैसास या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकीय मनोगत सुद्धा व्यक्त केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्वयंम कनगुटकर याने सेवकांची भूमिका पार पाडत शाळेची घंटा सुद्धा दिली.
मा. मुख्याध्यापिका सौ. खेडलेकरबाई यांच्या हस्ते या शिक्षक रुपी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'आई माझा पहिला गुरु' अंतर्गत आज इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांनी मातृ पूजन केले.
आई आपली पहिली गुरु आहे. आपल्या आईला संस्कृतीमध्ये महत्त्वाचे व पावित्र्याचे स्थान आहे. आईप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी मातृ पूजन खूप महत्त्वाचे आहे.
आईला ईश्वर रूप देण्याचा संस्कार बालमनावर कोरला जावा हाच या उपक्रमाचा उद्देश सफल होताना दिसला.
अशाप्रकारे अतिशय उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.