न्यू इंग्लिश मिडीयम, शनिवार पेठ ,पुणे.
“मातीशी नाते जोडूया, पर्यावरणाचे रक्षण करूया!”
डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.
शाळेच्या कला शिक्षिका सौ. रुपाली कनोजे. व सौ.अपूर्वा आरगे.यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणातील विविध प्रकारच्या मातीचे महत्त्व समजावून सांगितले. शाडू मातीपासून सुंदर, आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कशा तयार कराव्यात, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी गणेशमूर्ती घडविण्याचा आनंद घेतला. गणेशमूर्ती निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, सर्जनशीलता विकसित झाली आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची प्रेरणा मिळाली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
आजच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषणाचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शाडू माती व नैसर्गिक मातीपासून गणेशमूर्ती तयार करून त्यांचे विसर्जन केल्यास पर्यावरणाची हानी कमी करता येते. विद्यार्थ्यांना जलस्रोतांचे संरक्षण, मातीचे महत्त्व आणि निसर्गाशी असलेले आपले नाते याविषयी मौलिक माहिती देण्यात आली. कार्यशाळेला अधिक सुंदर स्वरूप प्राप्त झाले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख मिस यांच्या मार्गदर्शनाने
या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी केवळ गणेशमूर्ती तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले नाही, तर पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही समजून घेतली. “शाडू मातीचा गणपती, पर्यावरणाची सुंदर ग्वाही” हा संदेश देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया, निसर्गाचे रक्षण करूया आणि भावी पिढीसाठी स्वच्छ, सुंदर व निरोगी पर्यावरण घडवूया!