पुणे, १६ सप्टेंबर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सभामंडपात योग संस्थान पुणे आणि लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या वतीने सामूहिक सूर्यनमस्कार वंदन सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात *एन ई एम एस शाळेतील ७० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रत्येक विद्यार्थ्याने ५१ सूर्यनमस्कार घातल्याने विद्यार्थ्यांनी मिळून ३,५०० हून अधिक सूर्यनमस्कार पूर्ण केले. यावेळी क्रीडा शिक्षक श्री. प्रमोद उकिर्डे हे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सूर्यनमस्काराचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावे आणि त्यांच्यामध्ये नियमित व्यायामाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
सादरीकरणानंतर सहभागी विद्यार्थी व पालकांसाठी विशेष दर्शन आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली.
आयोजक डॉ. विदुला शेंडे मॅडम आणि विश्वास शेंडे सर त्याच बरोबर शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.