माझी आई

शिक्षण विवेक    22-Sep-2026
Total Views |

Am 

माझ्या आईचे नाव सौ. विदुला प्रमोद शेट्टीगार आहे. माझ्या आईचा स्वभाव नेहमी काहीतरी चांगले काम करत राहणे आहे. माझी आई एक कर्तव्यदक्ष गृहिणी आणि समाजसेविका आहे. माझी आई सकाळी पाच वाजत उठून मला आणि बाबांना डबा देते. आम्हा दोघा बहिण भाऊना ती अत्यंत लाडाने सांभाळ करते पण अभ्यासाच्या बाबतीत तिची कडक शिस्त आहे. संध्याकाळी. शुभंकरोती झाले की ती आम्हाला अभ्यास पूर्ण करायला सांगते. अभ्यास झाला की आमच्या सोबत थोडा वेळू गप्पा मारते. मग आम्ही. अष्णपूर्णा मातेचा श्लोक म्हणूनच भोजन आरंभ करतो जे तीनेच शिकवले आहे माझ्या आईला वाचनाची प्रचंड आवड आहे तिने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील बऱ्याच पुस्तकांचे वाचन केले आहे. आमच्या सोसायटी मध्ये तीने माझ्या मित्रासोबत 'वाचनकट्टा' असा नविन उपक्रम सुरू केला आणि त्याला उत्तम प्रतिसाद आहे,

माझ्या आईने खूप ठिकाणी सावरकर आणि टिळकांवर निबंध स्पधा आणि वकतृत्त्व स्पर्धा घेतलेली आहे. वेगवेगळ्या शाळेत जाऊन सावरकर कोण होते? गणपती बाप्पा मोरया' या जयघोषांता 'मोरया' असेच का म्हणतात त्यांची गोष्ट सांगते. एकदा मी माझ्या आईला विचारले की तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे बक्षीस कोणते आहे? तेव्हा तीने मला सांगितले लोकमान्य टिळकांचे पणतू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू यांची प्रत्यक्ष भेट हँच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे बक्षीस आहे,

नाव - ऋषिकेश प्रमोद शेट्टीगार
शाळेचे नाव - महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ
इयत्ता - ७ वी तुकडी ब