शिक्षण प्रसारक मंडळीची मराठी माध्यम शाळा,निगडी आयोजित शिक्षकांसाठी राष्ट्रभक्ती गीत गायन कार्यशाळा

शिक्षण विवेक    23-Sep-2026
Total Views |
spm
निगडी, दि. २२ सप्टेंबर २०२६ वार - मंगळवार रोजी शिक्षण प्रसारक मंडळीची मराठी माध्यम शाळा, निगडी येथे शिक्षकांसाठी ‘राष्ट्रभक्ती गीत गायन व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रप्रेमाची भावना अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच दैनंदिन अध्यापनामध्ये समूहगीतांचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा. श्री. शरद कुंटे सर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी मा.श्री.शरद कुंटे सर शाला समिती अध्यक्ष मा. ॲड.डॉ. राघव अष्टेकर सर, शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सविता बिराजदार ( मराठी माध्यम ) मा. मुख्याध्यापिका सौ.लीना वर्तक ( इंग्रजी माध्यम ) तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत सरस्वती माता व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
शाळेतील शिक्षकांनी समूहगीत गायले. या समूहगीतासाठी शाळेतील विद्यार्थी श्लोक कुलकर्णी व अनुष्क यादव यांनी उत्तम तबल्याची साथ दिली.
या कार्यशाळेसाठी शिक्षण प्रसारक मंडळी पुणे, मातृ संस्थेच्या विविध शाळांमधील शिक्षकांनीही सहभाग घेतला.
प्रमुख पाहणे मा. शरद कुंटे सर यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांना अपरिचित देशभक्तीपर गीतांची ओळख व त्यांचे गायन, विविध देशभक्तीपर गीतांच्या चाली, ताल व सादरीकरणाच्या शैलीचे मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रभक्तीपर समूहगीतांचा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन अध्यापनात प्रभावी व आनंददायी पद्धतीने वापर कसा करता येईल, याबाबतही मार्गदर्शन केले .
सर्व शिक्षकांनी विविध गीतांचे सामूहिक गायन करून या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वातावरणात राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली. गीत, संगीत आणि सामूहिक गायनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका वैभवी फडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोनिका बोरसे यांनी केले.
शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा मार्गदर्शन, संगीताचा आनंद आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा यांचा सुंदर संगम ठरली
शाळा समिती अध्यक्ष मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर सर
यांच्या संकल्पनेतून,शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ.सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात,आनंददायी वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली.