लातूर: दि.२४/९/२०२६ वार गुरुवार रोजी श्री केशवराज विद्यालय,लातूर येथे शिक्षणविवेक सप्टेंबर महिन्यातील अंकाचे प्रकाशन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.शैलेंद्र कंगळे सर,उपमुख्याध्यापक मा.श्री.महेश कस्तुरे सर,पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री कुलकर्णी मॅडम, श्रीमती इंदू ठाकूर मॅडम श्रीमती अंजली निर्मळे मॅडम,श्री.धनंजय कुलकर्णी शिक्षणविवेक प्रमुख स्मिता मेहकरकर, सहप्रमुख श्रीमती श्रीमती साधना प्रयाग, विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले. या महिन्याच्या अंकात कु. पंकजा होळंबे(७ वी) निसर्गाचा वाढदिवस कविता, कु.सुमेधा भालकीकर(५ वी)चित्र हे साहित्य प्रकाशित झाले आहे. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.