गणेश विसर्जन सोहळा

शिक्षण विवेक    30-Sep-2026
Total Views |
mes
 
म.ए.सो. रेणावीकर माध्यमिक विद्यालयात गणेशमूर्तीचे विसर्जन भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. मातीची मूर्ती असल्याने प्रशालेतच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

उत्तरपूजा इयत्ता आठवीतील विद्यार्थी चि. भावार्थ निलेश अद्वंत याच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अनन्या तुंगार हिने सुंदर गणेश वंदना सादर केली. आरतीनंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.