शनिवार पेठेतील एन. ई. एम. एस. शाळेत दिनांक १ सप्टेंबर २६ रोजी दोन्ही सत्रातील इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थिनींसाठी आयुर्वेद व्यासपीठ पुणे व पिंपरी चिंचवड तर्फे ' कळी उमलताना ' हे सत्र पार पडलं. या सत्रासाठी वैद्य श्वेता करंबेळकर आणि वैद्य प्रज्ञा दळवी या वक्त्या म्हणून लाभल्या होत्या.
या विषयाअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते तरुण वयापर्यंत होणारे शारीरिक व मानसिक बदल हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. शरीररचना, Menstrual cycle व त्यानुसार रोजचा आहार, व्यायामाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी- स्वच्छता, विविध माध्यमांचा, जाहिरातींचा होणारा दुष्परिणाम, इत्यादी गोष्टी या ppt च्या माध्यमातून अगदी सहज समजावून सांगितल्या.
वाढत्या वयात वाटणाऱ्या आकर्षणामुळे प्रभावित न होता, मर्यादा न ओलांडता मनावर नियंत्रण ठेवून, Healthy Friendship, निखळ मैत्रीचा आनंद घेऊन स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध कला आत्मसात करणे, वाचन करणे असे छंद जोपासण्याचा संदेश दिला.
सत्राच्या शेवटी विद्यार्थिनींनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
सत्रासाठी विद्यार्थिनी आणि शिक्षकांबरोबर काही पालक प्रतिनिधीही उपस्थित होते.
संपूर्ण सत्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.