रमणबाग प्रशालेत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा

शिक्षण विवेक    07-Sep-2026
Total Views |
des
शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी प्रशालेत दहीहंडी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे, मुख्याध्यापक आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी ,पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर, शिक्षक प्रतिनिधी सुधा लांडे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या साहसी गुणांना वाव मिळून त्यांचा उत्साह वाढतो, असे आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक आशा माने म्हणाल्या. शाला समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गोविंदांच्या उत्साहाचे कौतुक केले.
कलाग्राम मधील कृष्ण मंदिरातील कृष्णाचे देखील विधिवत पूजन करण्यात आले.
'कृष्णाचा गोपाळकाला चला गड्या पाहू चला' या गीताचे गायन प्रशालेतील शिक्षिका वैशाली भोकरे यांनी केले. 'गोविंदा आला रे आला', हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की', या आरोळ्यांनी आणि ढोलताशाच्या गजरात शाळेतील गोविंदांनी दहीहंडी फोडली. सर्व गोविंदांनी गोपाळकाल्याचा प्रसाद आनंदाने एकत्रितपणे खाल्ला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन दिनविशेष विभागप्रमुख प्रज्ञा करडखेडकर यांनी प्रशालेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने केले.