दिनांक 5 सप्टेंबर 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत आज आगळ्या वेगळ्या स्वरूपात शिक्षक दिन व गोपाळकाला साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा संतोष तिकोने , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉक्टर विठ्ठल मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर अनघा कडू यांनी शिक्षक दिनाची माहिती सांगितली. यानंतर गोपाळकाला निमित्त पुस्तक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांना वाचनाची सवय वाढावी म्हणून पुस्तक हंडी द्वारे वाचनाचा प्रसार करण्यात आला. यावेळी पुष्पा राऊत यांनी मुलांना गोपाळकाल्याची माहिती सांगितली. सुरेखा भामरे यांनी सूत्रसंचालन केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्मावर आधारित नृत्य सादर केले. यावेळी इयत्ता दुसरीची इच्छा राजबहार राधाच्या वेशभूषेत तर वीरेन सोनटक्के कृष्णाच्या वेशभूषेत आला होता . यावेळी माननीय मुख्याध्यापिका यांनी मुलांकडून वाचनाविषयी प्रतिज्ञा व घोषणा म्हणून घेतल्या. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी व पुस्तक हंडी ची सजावट केली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मनोरे रचून कृष्णाला दहीहंडी फोडण्यात मदत केली. तसेच वाचना चे महत्व याविषयी घोषणा दिल्या आणि रोज काहीतरी नवीन वाचनाचा संकल्प केला .शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी छान छान भेटकार्ड बनवून आणून शिक्षकांना दिले. शहनाझ हेब्बाळकर यांनी आभार मानले.
*वार्तांकन*
सौ शहनाझ हेब्बाळकर