म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे इयत्ता सातवीतील सर्व व विद्यार्थिनींसाठी पर्यावरणपूरक राखी कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली . पर्यावरणाला हानी न पोहोचविणारे विविध साहित्य जसे बांबूच्या काड्या, लाकडी मणी, कागद व बिया इ.यांचा वापर करून आकर्षक राख्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक तसेच विविध फुले व पाने यांच्या सहाय्याने राखी याचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे आणि “टाकाऊपासून टिकाऊ” या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश . अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कलागुणांना व कार्यानुभवाला चालना मिळते . पर्यावरणाला हानी न पोहोचवता नवनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी अशाच विविध उपक्रमांत द्वारे घ्यावा. विद्यार्थ्यांसाठी “निसर्गाचे रक्षण, हीच खरी राखी” आणि “पर्यावरणपूरक रक्षाबंधनाचा संकल्प” असा सुंदर संदेश दिला.
या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या कल्पकतेने सुंदर व आकर्षक पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या.
श्री.पवार सर, सौ.सावर्डेकर मॅडम,सौ.सहारे मॅडम यांचे सहकार्य लाभले.