महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणावीकर विद्या मंदिर शाळेत दरवर्षीप्रमाणे नवीन समाजोपयोगी पायंडा पाडत पर्यावरण पूरक दहीहंडी साजरी केली गेली .मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या नवनवीन संकल्पना मधून विविध पर्यावरण पूरक उपक्रम घेतले गेले.
यामध्ये दहीहंडी म्हणून विविध वृक्षांच्या बियांच्या पोटल्या मटक्यामध्ये ठेवण्यात आल्या . तसेच वृक्षारोपण केले, कापडी पिशव्या बनविण्यात आल्या. तसेच घरातील व परिसरातील प्लास्टिक कमी करण्याच्या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्याने प्लास्टिक ब्रिक्स बनवून आणल्या . जुन्या कपड्यांपासून खुर्च्यांवरच्या मॅट, टेबल मॅट, कव्हर बनवून विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मकतेचेही प्रदर्शन घडविले.
भगवान श्रीकृष्णाच्या गोपाळकाला या संकल्पनेचे सामाजिक महत्त्व सौ. रसिका देवचक्के यांनी उलगडून दाखविले. ज्येष्ठ अध्यापिका सौ. स्वाती गराडे यांनी पर्यावरण पूरक उपक्रमांचे महत्त्व आणि माहिती दिली. संगीत शिक्षक श्री कल्पेश अदवंत सर आणि सौ. शकुंतला आहेरकर यांनी विद्यार्थ्यांकडून गाणी म्हणून घेतली. त्यानंतर तीन थरांचे मानवी मनोरे रचून दहीहंडी पारंपारिकरित्या फोडून सर्व विद्यार्थ्यांना दही काल्याचा प्रसाद देऊन उपक्रमाची सांगता झाली. राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेत काही विद्यार्थी आलेले होते. यामध्ये सर्व शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे सहकार्य लाभले.