शिक्षण माझा वसा २०२२

शिक्षण विवेक    18-Oct-2021
Total Views |

shikshan maza vasa 2022_1 
 
🏆 शिक्षणविवेक आणि लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित 'शिक्षण माझा वसा' राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०२२! 🏆
 
✨ पुरस्काराचे विभाग - भाषा, गणित, विज्ञान, कला, तंत्रज्ञान, उपक्रमशील मुख्याध्यापक, विशेष. 
 
● केवळ पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी!
 
▪️ नामांकनासाठीचे निकष व नियम: 
● पाठवणाऱ्या शिक्षकाचे कमाल वय ४५ वर्षे असावे. (दि. १ डिसेंबर, २०२१ पर्यंत)
● जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे. ( उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कारासाठी वयाची अट नाही. )
● किमान ५ वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.
नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक : दि. बुधवार १ डिसेंबर, २०२१
● निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.
 
▪️ नामांकन पाठवण्याचे स्वरूप:
आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे पाठवावी.
शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन.
 
▪️ उपक्रमासंबंधीची छायाचित्रे :
वरील माहिती ‘शिक्षणविवेक’, म.ए.सो. भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30 या पत्त्यावर कुरिअरद्वारे किंवा mazavasa2022@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी.
किंवा ही सर्व माहिती ऑनलाईन भरण्यासाठी www.shikshanvivek.com या शिक्षणविवेकच्या संकेतस्थळाला भेट देऊन तेथील लिंकवरील गुगल फॉर्म भरावा. (https://forms.gle/BWLDseYYyZBFxe3e6 ) फॉर्म भरल्यानंतर खालील संपर्क क्रमांकावर मेसेज करावा.
 
▪️ पुरस्काराचे स्वरूप :
रु. ५०००/- रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह
 
▪️ संपर्क : 7045781685, 9112257774
सदर माहिती आपल्या परिसरातील शिक्षकांना पाठवून प्रचार व प्रसार करावा.