वाईज अँड अदरवाईज

शिक्षण विवेक    02-Oct-2021
Total Views |

wise and otherwise_1  
वाईज अँड अदरवाईज
लेखक - सुधा मूर्ती
अनुवाद - लीना सोहोनी
सुधा मूर्ती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे नाव माहित नसेल असा भारतीय विराळाच.
सुधा मूर्ती यांचा जन्म 1950 साली कर्नाटकातील हवेरी जिल्हातील शिग्गाव येथे झाला. त्यांनी कम्प्यूटर सायन्स या विषयातील M.tech. ही पदवी प्राप्त केली असून त्या सध्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत.
आत्तापर्यंत त्यांच्या वीसहून अधिक कादंबर्‍या, तंत्रज्ञान विषयक पुस्तके आणि प्रवासवर्णने प्रसिद्ध झालेली असून ही सर्व साहित्यनिर्मिती कन्नडमध्ये आहे.
याशिवाय इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे समाजातील मोठ्यमोठ्या बुद्धिमंतांच्या विकासाला चालना देणे आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात.
त्यासाठी सुधाजी स्वत: सगळीकडे भटकंती करतात, प्रत्यक्ष भेटून परिस्थिती पाहून मदत काय करावी हे ठरवितात.
भारताच्या अत्यंत मागास आर्थिक भागांमध्ये सुधाजींनी भटकंती केली आहे. अठराविश्‍वे दारिद्र्यात राहणार्‍या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा पोहोचविण्यासाठी त्यांनी आटोआट प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरातील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या.
एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी कथारूपात आपल्या समोर मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखन शैलीतून निर्माण झालेले हे पुस्तक सुधा मूर्ती यांचे कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.
तर विद्यार्थ्यांनो मिळवा हे पुस्तक आणि वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटेल ? हे शिक्षणविवेकला जरूर कळवा...
- स्वाती गराडे, सहशिक्षिका,
मएसो कै. दा.शं.रेणावीकर विद्यामंदिर, अहमदनगर.