कापडाचे आकाशकंदील

शिक्षण विवेक    20-Oct-2021
Total Views |

kapadache aakashkandil_1&
 
साहित्य - एक रिकामे खोके, कात्री, कटर, ठेवणीतील काठपदराचे कापड, फेव्हीकोल, दोरी व सजावटीसाठी उपलब्ध साहित्य.
कृती - प्रथम खोक्याच्या चारही बाजू मधोमध कापून चौकट तयार करणे साधारणपणे फोटोफ्रेमसारखे.
नंतर काठपदराचे कापड खोक्याच्या चारही बाजूनां प्रमाणशीर पद्धतीने लावून घेणे. वरच्या बाजूला आकाशकंदील अडकविण्यासाठी दोरी लावणे. उपलब्ध साहित्यातून आवडीप्रमाणे आकाशकंदीलाची सजावट करणे.
विशेष टीप - समस्त स्त्रीवर्गाला मानवंदना द्यावी हा उद्देश मनात ठेवून स्त्रियांच्या आवडत्या अलंकारापैकी एक नथ तसेच कुंकू,फेटा यावर साकारण्याचा प्रयत्न केला.
तुझे अस्तित्व कधीच न संपणार
या विश्वात तू अशीच चमकत राहणार!
 
- मनिषा कदम, शिक्षिका,
नवीन मराठी शाळा,पुणे.