रंगीत रांगोळी भेटकार्ड

शिक्षण विवेक    22-Oct-2021
Total Views |

rangit rangoli bhetkard_1 
 
कलाकृती
रंगीत रांगोळी भेटकार्ड
साहित्य : कार्डपेपर, कटर, गम, अ‍ॅक्रिलिक रंग, गम, पेन्सिल, फुटपट्टी, रंगाचे साहित्य (ब्रश, वाटी, पाणी, इ.)
कृती : 1. साधारण 8’’*10’’ आकाराचा कागद कापा व मध्यावर दुमडा. आता दुमडलेल्या कागदापेक्षा मोठ्ठा आणखी एक कार्डपेपर कापून घ्या.
2. या मोठ्ठ्या कागदाच्या मध्यावर कुठल्याही भौमितिक आकारांचे चित्र काढून घ्या.
3. या चित्रातील मोठ्ठे आकार कटरच्या साहाय्याने कापा म्हणजे सुरेख जाळीचे नक्षीदार चित्र तयार होईल.
4. या चित्राच्या तिन्ही बाजूंना मार्जिन करून घ्या. आतील बाजूस दुमडा. ही जाळी भेटकार्डाच्या बाहेरील बाजूस फक्त मार्जिनला गम लावून तीन बाजूस चिकटवा.
5. जाळीवर पाकीट तयार होईल.
6. वेगळ्या कार्डपेपरवर आतल्या आकारचा आयत कापून घ्या.
7. त्यावर ब्रशने वेगवेगळ्या रंगाचे शिंतोडे मारा. फराटे मारले तरी चालतील.
8. थोडी चकमक वापरल्यास सुंदर दिसेल.
9. वाळल्यावर हा कार्डपेपरचा तुकडा जाळीवर पाकीट भेटकार्डात सरकवा.
10. आतील बाजूस दिवाळीचा शुभ संदेश लिहा व आपले आप्त, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांना शुभेच्छा कार्ड म्हणून पाठवा.
- अर्चना जोशी