वरदायिनी तू विश्व मोहिनी

शिक्षण विवेक    08-Oct-2021
Total Views |

varadayini tu vishwa mohi 
 
देवी सरस्वती महन्मंगले
तुझे स्तवन हे वाग्विलासिनी
देवी सरस्वती
तुझी प्रेरणा अम्हा मिळावी
नम्र भावना मनी वसावी
ज्ञानयज्ञी या अमुचे जीवन
अर्पण करू हे भाग्य शालिनी!१!
वेद शास्त्र रस कला साधना
साकाराव्या नव्या कल्पना
सुफलित व्हावे जीवन अवघे
तुझ्या कृपेने वीणा धारिणी !२!
नव्या युगा ला पूर्णत्वाचे
मार्ग दाखवी एकत्वाचे
तव तेजाने विश्व कोंदिले
वरदायिनी तू विश्व मोहिनी!३!

© चारुता शरद प्रभुदेसाई,
पुणे,९९२२७५१८१९
संगीत:श्री.अजय पराड
गायन:स्वप्नील भावे व सहकलाकार