जीवनकौशल्ये

19 Nov 2021 11:01:51

jeevan koushaley_1 &
 
जीवन कौशल्ये आहेत दहा यामध्ये
आहे जीवनाचा अर्थ खरा.
पहिले स्वःची जाणीव असून
आपल्या आवडी-निवडी, आपल्या
अस्तित्वाचा अर्थ खरा.
दुसरे समानभूती असून
एखाद्या भूमिकेत शिरण तिचे
विचार करण्याची क्षमता साधणे.
तिसरे समस्या निराकरण असून
जीवनात येणार्‍या अडचणी व समस्या
यातर यशस्वी मार्ग काढत उद्दिष्ट गाठणे.
चौथे निर्णयक्षमता असून
योग्य वेळी योग्य निर्णय घेणे
यातून जीवनाची सुलभता साधणे.
पाचवे परिणामकारक संप्रेषण असून
आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करणे
आणि अपेक्षित यश मिळवणे.
सहावे व्यति व्यक्तीमधील सहसंबंध असून
सहकार्य, समजूतदारपणा यातून
परस्परसंबंध अधिक बळकट करणे.
सातवे सर्जनशील विचार असून
नवीन असाधारण निर्माणाचा विचार
यातून नवनिर्मितीस प्रेरणा मिळणे.
आठवे चिकित्सक विचार असून
एखाद्या विषयाची सत्यता पडताळून पाहणे
यातून तर्कशुध्द विचारांची सवय अंगी बाळगणे.
नववे भावनांचे समायोजन असून
भावनांचे संतुलन राखणे यातून
सामाजिक नैतिक, बौद्धिक दृष्ट्या यशस्वी होणे.
दहावे ताणतणावाचे समायोजन असून
ताणतणावाची स्थिती यशस्वीरित्या हाताळणे
यातून सकारात्मक विचार करणे.
जीवनकौशल्ये ही ज्जीवन आणि शिक्षण
यांची सांगड आहे म्हणून यशस्वी
जीवनाची ती गुरुकिल्ली आहेत.
- रोहित रमेश कुलकर्णी. स्वा. सावरकर प्राथमिक विद्यालय बीड (सहशिक्षक)
Powered By Sangraha 9.0