माळरानातला राजा... माळढोक

शिक्षण विवेक    24-Dec-2021
Total Views |

malaranatala raja maldhok
गोदावन... म्हणजे माळढोकचं (Great Indian Bustard) राजस्थानी अस्तित्व.याला हवा असलेला अधिवास इथे टिकून असल्यामुळे हा पक्षी इथे सुरक्षित आहे.आमच्या दोन्ही गाड्या ॠखइ च्या दिशेनी पण दोन वेगळ्यामार्गावरून निघाल्या. सुरवातच रस्त्याच्या शेजारी एका मृत उंटाजवळ बसलेलीआणि मान आत घालून त्याचे लचके तोडत असलेली इजिप्शीयन गिधाडं दिसली. गाडीचावेग कमी होताच ती उडली नाहीत पण आमच्यापासून दूर जायला लागली. ते अंतरवाढायच्या आतंच आम्ही पटपट त्यांचे पोर्ट्रेट फोटोग्राफ्स काढले आणित्यांच्या मेजवानीत अजून व्यत्यय न आणता गाडी पुढे पिटाळली. पुढे जाऊनसुदासरीच्या गेटपाशी तिकीट काढलं आणि या वाळवंटी जंगलात प्रवेश केला.नुकताच सूर्य उगवला होता त्यामुळे पुढच्या तासा-दीडतासांतच कोर्सर, व्हिटीअर, बुशचॅट, लार्क, पिपिट, श्राईक, फिंच, रॅवन, ईगल, बझर्ड, केसट्रल, व्हलचर, फाल्कन अशा सत्तर टक्के प्रजाती बघून झाल्या होत्या. आपल्याकडेजसे चिमण्या-कावळे दिसतात ना तशी इथे कुठेही अगदी रस्त्यालगत सुद्धाइजिप्शीयन गिधाडं बसलेली दिसतात. पण अजून माळढोक काही दिसला नव्हता. आम्हीमाळढोकच्या मैदानात आलेलो होतो. याभागात काही ठिकाणी चक्क कुंपण घातलेलंआहे. ते कशाकरता आहे असं विचारल्यावर कळलं कि आत ॠखइ सुरक्षित राहण्यासाठीकिंवा आत अंडी घालण्यासाठी म्हणून ते केलेलं आहे. सकाळच्या प्रहरी एक दोनजोड्या किंवा कधीकधी पाच ते सहा ॠखइ सुद्धा त्या कुंपणाबाहेर येतात.त्यांना त्यावेळेला जर काही धोका जाणवला तर ते लगेचच भरार्‍या मारत आत निघूनजातात. त्या कुंपणाच्या आत पर्यटकांना जायला मज्जाव केलेला आहे. जर दूरवरएखादा माळढोक आढळला तरी आपली गाडी एका ठराविक अंतरापलीकडे नेऊच शकत नाही.त्यामुळे दुर्बीण आणि टेलीफोटो लेन्स जवळ बाळगलेलीउत्तम. एकंदरीतच हा एक संवेदनशील विषय असल्यामुळे खरे पक्षिमित्र त्यांचीमर्यादा ओलांडत नाहीत. हे सगळं ऐकल्यावर आता आपल्याला ॠखइ कसा दिसणार याचीउत्कंठा लागून राहिली होती. आमचा गाईड कम ड्रायव्हर सर्वतोपरी प्रयत्न करूनआम्हाला ॠखइ दाखवायचा प्रयत्न करत होता. त्याच्या शोधात असताना आम्हालाएका टॉनी ईगलनी खूप सुंदर दर्शन दिलं. त्याच्या हळूहळू जवळ जात आणि फोटोघेत घेत आम्ही पुढे सरकलो. टॉनी ईगलचे मनसोक्त फोटो मिळाले होते त्यामुळेतेच विचार डोक्यात असताना एका जवळच्या केरूच्या झाडापलीकडून प्रचंड मोठंअसं काहीतरी आकाशाकडे झेपावलं. आम्ही सगळे व्हलचर-व्हलचर असं बडबडत कॅमेराडोळ्याला लावला. पण कुठंच काय? क्लिक करेपर्यंत ते कुठच्या कुठे जाऊन पोचलंहोतं. अगदी जवळचा फ्लाइंग शॉट मिस झाला. ती खंत चेहेर्‍यावर स्पष्ट दिसतअसतानाच अन्वर म्हणाला, सरजी ये व्हलचर नही था, ॠखइ था। आम्हीएकमेकांकडे बघतच बसलो. हाता तोंडाशी आलेला घास तसाच गेला होता. म्हणजेइतक्या जवळ आपण आलो होतो तरी तो आपल्याला दिसलाच नाही?? एवढा मोठा पक्षीआपल्या नजरेतून सुटलाच कसा? उडताना त्याच्या आकाराचा चांगलाच अंदाज आम्हालाआला होता. आता कधी त्याला जमिनीवर उभा पाहतोय असं झालं होतं. आत्ताची संधीआमच्या हातून निसटली होती. त्यामुळे मन थोडं खट्टू झालं होतं.
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे सकाळचं सगळंआवरून आम्ही बाहेर पडलो. हवेत चांगलाच गारठा होता. आज सगळ्यांनी ॠखइ चाचध्यास घेतला होता. कालच्याप्रमाणे त्या कुंपणाच्या आसपास इतर पक्षी बघत जातअसताना कळलं कि दुसर्‍या गाडीला ॠखइ ची एक जोडी दिसली आहे म्हणून. आम्हीलगेच त्यादिशेनी गेलो. गाडी एका ठराविक अंतरावर जाऊन थांबली. दुर्बीणडोळ्याला लावली. समोर सकाळच्या कोवळ्या उन्हात एक जोडी मोठ्या डौलानंपदन्यास करत होती. समोरचा देखावा खरंच दृष्ट लागण्यासारखा होता. मागच्याकुंपणाच्या तारेवर आठ-दहाच्या समूहानी महालातल्या सदस्यांप्रमाणे बसलेलेहोले (Eurasian-collared Dove), इतर प्रजाजनाप्रमाणे इकडे तिकडे करत असलेलेवेडेराघू (Green Bee-eater), सिमेंटच्या खांबावर पहारेकर्‍याच्या रुबाबातबसलेले दोन ससाणे (Laggar Falcon) आणि एखाद्या मंत्र्याच्या दिमाखात चरतअसलेला चिंकारा (Indian Gazelle) हे सगळे जणूकाही या माळरानाच्या राजालासकाळच्या न्याहरीसाठी संरक्षण द्यायलाच थांबले होते. अशा या गवताळमहालाच्या एका झाडाच्या सावलीतून राजा राणीची जोडी सोनेरी उन्हात आली आणित्यांच्या पाठीवरची तपकिरी पिसं काहीशी चकाकली. मानेखाली असलेला काळा पट्टाएखाद्या नेकलेससारखा भासत होता. पांढरी स्वच्छ मान आणि त्यावर छोटीशी काळीमुकुटासारखी भासणारी टोपी. अतिशय सावध असणारी त्यांची चाल हि खरोखरंचमाळरानाच्या राजाला शोभणारी होती. मधूनच आमच्या अस्तित्वाची जाणीवहोताक्षणीच वरच्यावर थांबलेलं पाऊल आणि किंचित वाकडी मान करून आमच्यादिशेला टाकलेला कटाक्ष सारं काही भुलवण्यासारखं होतं. पंधरा ते वीस मिनिटं आम्ही या देखण्या राजाच्यासान्निध्यात होतो पण त्या काही मिनिटातच महाराष्ट्रानी काय गमावलंय याचीपुरेपूर जाणीव झाली. इथे जरी माळढोक सुरक्षित असला तरी यांची संख्या फार नाही. त्यामुळे याप्रजातीवर अजूनही टांगती तलवार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
- अमोल बापट