शून्य खर्चाचे धमाल खेळ

शिक्षण विवेक    10-May-2021
Total Views |

shunya kharchache dhamal
 
दि. ९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० - १२ या वेळात शून्य खर्चाचे धमाल खेळ ही पालकांसाठीचे एक दिवसीय शिबिर घेतले गेले. राजीव तांबे यांनी पालकांशी संवाद साधत, मुलांशी खेळणं आणि तेही सर्जकपणे खेळणं किती आवश्यक आहे हे सांगितलं. आपली पालक म्हणून असणारी आणि मुलांच्या बरोबरीने वाढण्याचा एक प्रवास त्यांनी आपल्या बोलण्यातून साकारला.
अमरावती, पुणे, अहमदनगर, मुंबई, पालघर, नाशिक, औरंगाबाद, अंबेजोगाई या शहरातले पालक या ऑनलाइन शिबिरासाठी उपस्थित होते. आपल्या पाल्याप्रतीची आपली जबाबदारी मान्य करणारे हे पालक अनेक नवीन उपक्रमांसाठी उत्सुक असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येत होते.