पर्यावरण पूरक सुट्टी

शिक्षण विवेक    05-May-2021
Total Views |

paryavaranpurak sutti_1&n
 
विद्यार्थी मित्र-मैत्रिणिनो उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की आपल्याकडे बराच रिकामा वेळ असतो. थोडे दिवस शाळा नाही याचा आनंद जरी वाटला तरी नंतर नंतर या रिकाम्या वेळेचा कंटाळा येतो. मात्र या रिकाम्या वेळेला आपण थोडी कल्पकतेची जोड दिली तर या सुट्टीचा खूप चांगला उपयोग करता येईल. उदाहरण द्यायचे झाल तर तुम्ही तुमची सुट्टी पर्यावरण पूरक सुट्टी करू शकता नाही समजल? बघा आंपण आपल्या सुट्टीला पर्यावरण पूरक बनविण्यासाठी काय काय उपक्रम करू शकतो. आणि आपल्या रिकाम्या वेळेचा कसा छान उपयोग करू शकतो यासाठी काही कृती कार्यक्रम पुढील प्रमाणे करता येतील.
1) नैसर्गिक रंग तयार करणे - आपल्याला रंगपंचमीला रंग खेळायचे असतात, बाजारात मिळणार्‍या रंगात रसायने असतात. ती आपल्या त्वचेला डोळ्यांना अपायकारक असतात त्या एवजी आपण निसर्गाने दिलेले रंग तयार केले तर ? विद्यार्थी मित्रानो जरा निरीक्षण करा उन्हाळ्यात अनेक गडद रंगाची फुले फुललेली असतात. जसे गुलमोहर पळस इ. या फुलांचा उपयोग रंग बनविण्यासाठी छान होतो. तसेच फुलांच्या दुकानात उपयोगात नसलेली उरलेली झेंडूची फुले गुलाबच्या पाकळ्या ज्या कचरा म्हणून फेकल्या जातात या पासूनही छान रंग तयार करता येतो. तुमच्या घराच्या जवळपास शोध घेतलास तर एखाद जांबळाच झाड नक्की सापडेल, झाडावरून पडलेली खाता न येण्यासारखी जांबळे गोळा करून त्यांना वाळवून छान रंग तयार करता येईल असाच बितापासुन्ही छान रंग तयार होतो. रंग बनवायला हळद तर घरात सहज उपलब्ध आहे. वर आपण त्याचाही छान उपयोग करू बघा कसा ते जांबळाच्या बिया पण आणि इतर बिया पण.
2) रोपे तयार करणे - उन्हाळा आहे सुट्टीत आईस्क्रीम गोळा खाणे तर होताच असणार हे पदार्थ खाऊन झाले की हातात राहतो तो टाकाऊ कप किवा ग्लास विद्यार्थ्यानो याच्यापासून तुम्हाला खूप छान वस्तू करता येतील जास्त ग्लास हवे असतील तर आईस्क्रीम वाल्या काकांना भेटून विनंती करा ते वापरून झालेले हे ग्लास चमचे तुमच्यासाठी जमा करून ठेवतील हे ग्लास स्वच्छ करून यात थोडी माती भर आणि छान रोपे तयार करा जांबूळ फणस पेरू चिंच अशा अनेक बिया वापरून रोपे तयार करा. काही झाडांच्या (उदा. वड) छोट्या फांद्या (एक वित) मातीत खोचा थोड्याच दिवसात त्याला छान कोंब फुटेल, हि झाडे थोडी मोठी झाली की पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर एखाद्या ओसाड डोगरावर लावता येतील महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यामधून येणार्‍या वारकर्यांना हि रोपे द्या ते, त्यांच्या प्रवासात किवा गावात नेऊन नक्की लावतील आणि तुमच्या हातून पृथ्वीला वाढणार्‍या तापमानांपासून वाचवण्यासाठी वृक्षलागवड होण्याचे पुण्यकार्य होईल.
3) झाडांसाठी बोर्नव्हिटा, हॉरलिक्स तयार करणे.- उन्हाळ्यातल्या उन्हाच्या तडाखा यापासून आपण रक्षणासाठी व ओला कचरा व्यवस्थापनासाठी आपण खूप चांगला उपयोग करू शकतो. एखादी नायलॉनची पिशवी घ्या किंवा नाही मिळाली तर साधे पोते घ्या यामध्ये स्वयंपाक घरात आईने भाजी निवडल्यावर ड़चिरल्यावर उरणारा ओल्या कचर्याचे म्हणजेच पालेभाज्या, फळांच्या साली ,टरफले , अंड्याची टरफले इ. तुकडे करून भरत रहा हि पिशिवी जिथे उन येते अश जागी ठेवा. याला पाणी लागू देऊ नका. काही दिवसातच हा कचरा असा सुकतो की हाताने दाबला तर चुरा होतो. या पिशिवीची चेन लावा / पोत्याचे तोंड दोरीने बांध व एखाद्या काठीने चांगला झोडपा या सगळ्या कचर्याची चहाच्या पावडरसारखी पावडर होईल. आवश्यक वाटल्यास चालून बरणीत भरून ठेवा. मुलांनो हि पावडरचा उपयोग कुंडीतल्या अथवा जमिनीवर लावलेल्या झाडाच्या बुंध्याशी टाका याने मलचिंग होईल. म्हणजे माती मधले पाणी बाष्पाच्या रुपात उडून जाणार नाही मातीचा गारवा टिकून राहील तसेच हे खत हळू हळू कुजेल व झाडाला आवश्यक पोषक घटक मिळत राहतील झाले झाडासाठी बोर्नव्हिटा, हॉरलिक्स तयार
4) पक्षासाठी घरटी- आपण शहरात राहतो. शहरातल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये पक्षांना घरे बनवण्यासाठी आवश्यक झाडे झुडपे नाही तुमच्या सोसायटी मध्ये किंवा गच्चीमध्ये शक्य असेल तर पक्षांना राहता येईल अशी व्यवस्था नक्की करा. छोट्या मडक्या पासून, लाकडापासून ,खोक्यापासून (जाड) बांबूपासून तुम्ही छान घरटी बनविण्याची जागा उपलब्ध करून देऊ शकता मात्र हि घरटी सुरक्षित ठिकाणी लावा. अन्यथा पक्षी तिकडे फिरकतही नाहीत शक्य असेल तर झाडावर हि घरटी व्यवस्थित अडकवा आपल्या सारखेच त्यांनाही घर मिळायला हवे बरोबर ना ? नाहीतर कुठे राहतील ते बिचारे ?
5) बॉटल गार्डनिंग - खर तर आपल्या दिनचर्येतील प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे हे खूपच गरजेचे आहे. तरी श्रीखंडाचे आईस्क्रीमचे डबे, शीतपेयाच्या बाटल्या अशा अपरीहार्य प्लास्टिकला फक्त एकदाच वापरून फेकून देऊ नका त्याचा पुनर्वापर करा. या सर्व डब्यामध्ये तुम्ही छोटी सावलीत वाढणारी रोपे लावू शकता व आपल्या घराचा एखादा कोपरा हिरवागार करू शकता या बॉटल्स वर डब्यावर अ‍ॅकँलीककलरचे सुंदर चित्र डिझाईन काढा व आपल्या कायम स्मरणात रहाल .या प्रकारच्या बागेमध्ये पुदिना, कोथिंबीर, लसून पात व इतर इनडोअर प्लांट्सछान येतात. हे डबे हलके असल्याने रॉडवर अडकवून हॅगिग गर्देन तयार करता येईल हे डबे अडकविण्यासाठी दोरी वापरू नका त्या एवजी आईच्या जुन्या साड्या,ओढण्या यांच्या लांब पट्ट्या कापा आणि त्याच्या घट्ट वेण्या घालून दोरी तयार करा आणि ती वापर तुमची बाग अजून सुंदर होईल आणि काप्दाचाही पुनर्वापर होईल या शिवाय तुम्ही काही उपक्रम करू शकता.
1) कागदाचा ल्ग्दयापासून वस्तू तयार करा.
2) वह्याचे राहिलीले कोरे कागद वेगळे काढा व त्याची वही तयार करा.
3) निरनिराळ्या बियांचा संग्रह तयार करा.
4) पर्यावरणावर आधारित कात्रण कापून चिकट वही तयार करा
5) निसर्गात घडणार्‍या हालचालीचे फोटो घ्या.रेकॉर्डिंग करा.
6) शक्य असेल तेथे पक्षी ,प्राणी किताकासाठी दाणा, पाण्याची व्यवस्था करा.
7) अभयारण्य ला भेट द्या डोंगर दर्यांमध्ये फिरा निसर्गाचा अभ्यास करा, निसर्ग वाचा.
8) झाडे लावा.
9) परिसरातल्या झाडांना आवर्जून जाऊन पाणी घालून या.
10) घरात एक पिशवी अडकवा यामध्ये घरातील प्लास्टिक वेगळे जमा करण्याची स्वत;ला व कुटुंबातल्या इतर स्द्स्यानाही सवय लावा. नंतर हे प्लास्टिक रीसायकलला पाठवा.
विद्यार्थी मित्र मैत्रिणिनो या सगळ्या उपक्रमाबद्दल यु ट्यूब वर अनेक चांगले व्हिडीओ आहेत. त्यातून माहिती घेऊन आणि या माहितीला कृतीची जोड देऊन नक्की काहीतरी करा. मात्र एक पक्क हं या सगळ्यासाठी टाकाऊ वस्तुचाच वापर करायचा निसर्गासाठी तुमच्या छोट्या हातून मोठे कार्य घ्द्वन्यासाठी मनापासून शुभेच्छा चला तर मग कामाला लागुयात आणि आपली सुट्टी पर्यावरण पूरक बनवूयात.
प्रज्ञा सुधीर पवार
रेणुका स्वरूप प्रशाला, पुणे