माझा हटके उपक्रम!

शिक्षण विवेक    24-Jun-2021
Total Views |

maza hatke upakram_1  
 
माझा हटके उपक्रम!
शिक्षकांसाठी आगळीवेगळी स्पर्धा!
 
* स्पर्धेसाठी...
* कोरोनाकाळात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वत: तयार केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांना प्राधान्य.
* विद्यार्थांना शिकवताना त्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचा वापर केलेला असावा.
* त्यातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झालेली असावी.
 
* स्पर्धेत सहभागी होताना... 
* व्हिडिओत स्वत:चं नाव, शाळेचं नाव, स्पर्धेचं नाव घेणं अनिवार्य आहे.
* स्वत: तयार केलेल्या शैक्षणिक साधनाचं नाव, स्वरूप व परिणामकारकता देणे आवश्यक आहे.
* उपक्रम कोणत्या वयोगटासाठी राबविला आहे, तेही नोंदवावे.
 
* व्हिडिओ करताना...
* वरील माहिती असलेला व्हिडिओ 3 ते 4 मिनिटांचा असावा.
* व्हिडिओ करताना मोबाईल आडवा धरावा. बॅकग्राऊंड प्लेन असावी.
* आजूबाजूचे आवाज येणार नाहीत, तसेच स्वत:चा आवाज स्पष्ट आणि मोठा असेल याची काळजी घ्यावी.
 
* निकालाबाबत...
* प्राथमिक फेरीत निवडलेले व्हिडिओ शिक्षणविवेकच्या युट्युब चॅनलवर लाईक्स आणि व्ह्युजसाठी प्रसिद्ध केले जातील.
* स्पर्धेचा निकाल 70% लाईक्स-व्ह्युजवर आणि 30% परीक्षकांच्या गुणांवर अवलंबून असेल.
 
* बक्षिसे -
प्रथम क्रमांक - रू. 5000/-
द्वितीय क्रमांक - रू. 3000/-
तृतीय क्रमांक - रू. 1000/-
विशेष बक्षीस - रू. 2000/- (सर्वाधिक लाईक्स-व्ह्युज मिळवणारा व्हिडिओ विशेष बक्षिसास पात्र असेल.)
 
* व्हिडिओ mazaupakram@gmail.com या मेल आयडीवर पाठवावा. 
* व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख दि. २५ जुलै २०२१.  
 
* अधिक माहितीसाठी -
शिक्षणविवेक, मएसो भवन, 1214-1215, सदाशिव पेठ, पुणे - 30
020-24470129, 7045781685