आला आला पाऊस आला

शिक्षण विवेक    12-Jul-2021
Total Views |

aala aala paus aala_1&nbs 
 
आला आला पाऊस आला
जल भरले घन घेउनी आला
सरसर सरसर धाउनी आला
आनंदघन होऊनी आला ॥
वारा आला वारा आला
जाल्बिंदुना नाचवीत आला
तृषार्त धरणी अन लेकराना
शांतविण्यास्तव धावून आला ॥
जल भरल्या या मेघांनी
आनंद उधळीला या भूवरी
धरणी शमली झरेही फुगले
नद्या खळखळत्या धरेवरी ..॥
उठ मनुजा धाव लवकरी
थेंब थेंब हं जतन करी
ठरळप हार्वेस्टीग जाल्युक्त शिवार
यातून जालभरणी तू करी.. ॥
निसर्ग आपुला खरा सखा रे
हे तू नित्य मनी धरी
त्याच्यास्तव तू झीज जरासा
मग तू सुखी होशील सत्वरी ॥
- स्वाती गराडे, शिक्षिका
म.ए. सो. कै.दा.शं रेणावीकर विद्यामंदिर, अहमदनगर