मी पाहिलेला रायगड

शिक्षण विवेक    14-Jul-2021
Total Views |

mi pahilela raigad_1  
पहाटे ४ वाजता आम्ही रायगडावर जायला निघालो. आणि रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो तरीही आम्हाला किल्ला दिसत नव्हता. रायगडावर जाण्याचा मार्ग २ प्रकारचा आहे. त्यातला पहिला मार्ग पायी नाणे दरवाजा तर दुसरा रोपवे. आम्ही रोपवेपाशी गेलो, कारण २ मिनिटांत आम्ही रायगडावर रोपवेमुळे पोहोचणार होतो. प्रतिव्यक्ती १०० रुपये तिकीट. आम्ही ३ तिकीटे घेतली. आम्ही रोपवेच्या मार्गाकडे जात असताना शिवकालीन संग्रहालय पाहायला मिळाले. त्यात शिवकालीन शस्त्र, अलंकार, वस्तू, तलवारींचे प्रकार असे खूप पाहायला मिळाले. आम्ही रोपवेने किल्यावर पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्हाला तिथल्या गाईडने माहिती सांगायला सुरूवात केली. शिवाजी महाराजांनी १६५६ ला रायगड जिंकून घेतला आणि १६५६ ते १६७० या कालावधीत गडाचे बांधकाम सुरु होते. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्व श्रेष्ठ प्रसंग इ.स. १६७५ फेब्रुवारी ४ या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली आणि ७ मार्च १६८० मध्ये राजाराम महाराजांची मुंज याच रायगडावर झाली. अशी खूप माहिती घेत आम्ही राणी महाल, गंगासागर तलावाकडे गेलो असता, गंगासागर हे नाव यासाठी की या तलावात ७ नद्यांचे पाणी आहे म्हणून त्या तलावाचे नाव गंगासागर असे पडले. पुढे आम्ही राज सभा भरायची तिथे गेलो. तिथे एक भव्य प्रवेशद्वार दिसते. त्याला नगारखाना म्हणतात असे आम्हाला गाईडने सांगितले. पुढे महाराजांचा पुतळा वडाव्या बाजूस छोटं देऊळ दिसतं. पुढे होळीचा माळ म्हणजेच मोठी मोकळी जागा दिसते. पेठेच्या दोन्ही रांगांत प्रत्येकी २-२ दुकाने आहेत. बाजारपेठ आजही हुबेहूब जशीच्या तशीच आहे. पुढे जगदीश्वर मंदिर आहे. १५९६ मध्ये बांधले असे आम्हाला तिथल्या गाईडनी माहिती दिली. आत गाभाऱ्यात शंकराची पिंड आहे आणि त्या पुढे समाधी आहे.
- कृष्णा भालेकर, ६ वी,
शिक्षण प्रसारक मंडळींची मराठी माध्यम माध्यमिक शाळा, निगडी