गुरू ज्ञानाचा सागर

23 Jul 2021 14:47:42

Guru Dnyanacha Sagar_1&nb
 
गुरू ज्ञानाचा सागर 
असे जीवनाचा आधार ।१।
गुरू माय, तात, बंधू, बहिण
गुरू असे मार्गदर्शक महान ।२।
गुरू असे आदर्शाची खाण
भागवी ज्ञानाची तहान ।३।
गुरू परमात्म्याचे सगुण रुप
असे चैतन्य त्याठायी खूप ।४।
गुरू अनुभवांचे हो आगर
नेई शिष्यांची नौका पैलतीर ।५।
गुरुशिवाय नाही जीवनाला अर्थ
गुरुकृपेने जीवन होई सार्थ ।६।
गुरू देई जो ज्ञान शिदोरीचा वसा
पुढे नेऊ या आपण हा वसा ।७।
 
- विजया खालकर
Powered By Sangraha 9.0