मी अनुभवलेला पन्हाळा

26 Jul 2021 15:36:34

mi anubhavlela panhala_1&
 
गेले होती पन्हाळगडी करावयास स्वप्नपूर्ती
जाणून घेण्यास छाव्याची स्मृती
अन शिवबाची मूर्तिमंत कीर्ती
लागली होती जीवाला आस
मनाला झाला गडाचा भास
गाडीच्या खिडकीतून जणू माझे मन गडावर उचल खात होते
थोडे पुढे जाता दिसला गड असा काही झाला मनाचा गैरसमज,
पण गडानिशी पोहचता कळाला हा तर शिवरायांचा डाव होता मोगलफौजेची जशी झाली होती तशीच फजिती आज माझी झाली
अन् कुठेतरी वाटली ही तर आपलीच चतुराई
डोळ्यांनीशी दिसत होता तो तर होता फसवा पन्हाळा
आणि हाच आहे तो गनिमीकावा जो आजवर ना कोणा बघून वाटले
हीच असावी जीवनाची स्फूर्ती
बघितले विशाल बुरुज अन न कळणारी उंची
आजही पुरवते पायथ्याशी असलेल्या रयतेची तहान आणि म्हणूनच आहे शिवरायाची रयतेवर सावली महान ....
बघायला गेलो होतो बाप-लेकाची गुप्त बोलणी
परी भिंतीवर भलतीच बोलणी
मनाला वाटले मग काय रे कळाले आपल्याला ते शिवबा नुसते मुखातून मिरवा
काय कामाची ही तरुणाई जर हे असले कारनामे करी.....
जो खरा रक्षक तोची जाणे त्या वास्तूची पुण्याई
म्हणून .....म्हणूनच मनाशी एक ठाम निश्चय केला कुठेतरी हे सगळे संपले पाहिजे
आपण आपले महाराष्ट्राचे वैभव जपले पाहिजे
आपण आपले महाराष्ट्राचे वैभव जपले पाहिजे.......
- अपूर्वा जंगम
Powered By Sangraha 9.0