दप्तराची कैफियत

शिक्षण विवेक    05-Jul-2021
Total Views |

daptarachi kaifiyat_1&nbs 
 
ए गणोबा, जरा सरक ना, मला पण थोडी जागा दे. इतिहासाचे पुस्तक गणिताच्या पुस्तकाला म्हणाले. अरे किती कोंबून भरलंय शुभमनी हे दप्तर. आमचा पण जीव घुसमटतोय वह्या एकसुरात ओरडल्या. काल टाईम टेबल दिलंय वर्गात कंपासपेटीने माहिती पुरविली. तरी आपल्या सगळ्यांना का घेऊन जातो हा शुभम पाठीवर?. रोज आठ तासिका असतात. एखादी खेळाची असतेच. पण शुभमला वेळापत्रक बघायचा कंटाळा. मग काय सर्वांचा मुक्काम इथेच वर्षभर. रंगपेटी वैतागून म्हणाली. अरे तुम्हाला माहिती आहे का दप्तराचं ओझं कमी कसं करावं हे मोठ्या मॅडमनी सांगितलं! वेळापत्रक पाहून रोज नेमकीच वह्या, पुस्तके घ्यावी, वेळापत्रकात एका विषयाचे जोडतास लावले आहेत म्हणून रोज दोनतीनच विषयाचे साहित्य न्यावे. वह्या शंभर पानीच असाव्या. एका बाकावरच्या मित्रांनी ठरवून घेऊन दोघात मिळून एकच पुस्तक आणावे. आलेखवही, प्रयोगवही, चित्रकलावही तासापूरतीच न्यावी. दप्तराचे वजन मुलाच्या वजनाच्या दहा टक्क्याहूनही कमी असावे असा सरकारने नियमही केलाय. लंचबॉक्सने माहिती पुरविली. शाळेत शुद्ध, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोयही केली आहे. हे सुद्धा मोठ्या मँडमनी सांगितले. वॉटरबँग म्हणाली. पण ऐकणार कोण? कंपासमधला कर्कटक लागून किती जखमा होतात मला आणि मारामारी करताना रागाच्या भरात मला चक्क फेकूनही देतात. किती मळलोय मी. अंगसुद्धा दुखत सारखं दप्तराने तक्रार केली. रोज पाठ दुखते म्हणून शुभम खेळायला जात नाही ग्राउंडवर. नाही दुखणार तर काय? देवा शुभमला आणि त्याच्या मित्रमैत्रीणीना दप्तराच ओझं कमी करण्याची बुद्धी दे रे बाबा!
- मानसी वैशंपायन, मुख्याध्यापिका,
आद्य क्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल