लपलेला कलाकार

शिक्षण विवेक    08-Jul-2021
Total Views |

laplela kalakar_1 &n 
आपल्या प्रत्येकात एक मूल लपलेलं असत. अगदी तसच आपल्या प्रत्येकात एक कलाकार ही लपलेला असतो कधी अंगणात रांगोळीचे ठिपके जोडून, कधी फिरत्या चाकावर मातीला आकार देतं. तर कधी बेधुंद गाण्यावर ठेका धरून नृत्य करत स्वत:ला पूर्ण व्यक्त करत असतो.
प्रत्येकाने या लपलेल्या कलाकाराला अभिव्यक्त केलं पाहिजे. खोल मातीत दडलेल बीज जेव्हा मेघराज्याच्या आगमनानं प्रफुल्लीत होऊन हिराव स्वप्न फुलण्यासाठी आतुर असत....... अगदी तसचं हा आपला आतला कलाकार व्यक्त होण्यासाठी तळमळत असतो. नेहमीच्या व्यव्हारिक गोष्टीत रमलेल मन आणि सृजनशील प्रक्रियेत रमलेल मन या दोन अवस्था एकाच मनाच्या ........एका क्षणी मन आहे याची जाणीवही नसते. - तर दुसरीकडे मनाला असंख्य धुमारे फुटत असतात. काहीसं असचं होतं, व्यक्त होत असताना. प्रत्येक जान अशा दोन भूमिकांमध्ये जगत असतो.
नृत्य, नाट्य, वादन, गायन, चित्रकला या आणि अशा विविध कलांमधून कलाकार अभिव्यक्ती करत असतो. राजा रविवर्मा यांनी रेखाटलेल्या देवदेवतांच्या मोहक मूर्ती असो. भीमसेन यांचा अभंगातला सुरेल स्वर असो, झाकीर हुसेन यांचा तबल्यावर ठीर्क्नारा नाद असो की, बिस्मिल्ला यांची बोलणारी शहनाई असो........ सारेच कसे सुखद अनुभव देऊन जाणारे. प्रत्येकच अभिव्यक्तींच माध्यम वेगळं......स्वत:ला मांडण वेगळ.
स्व:ततला हरवलेला -लपलेला कलाकार जपण्यासाठी कलेचे नियम - ब्ध्नाची काही गरजही नसते. स्वच्छंद आकाशात विहार करणारं पाखरूं कधी एका सरळ रेषेत विहार्ताना आपण पाहिलंय का? नाही नां........!
मुक्तपणे स्व:तला समर्पित कराव लागतं. अभिव्यक्त होताना आणि या समर्पणानंतर मिळणारा आनंद काही अवर्णनीयच असतो. ते क्षण आपण दुसर्‍यांसाठी नसून स्वत:साठी जगलेले असतात. ते क्षण फक्त आपलेच असतात. फक्त आपले.......!
अविष्कारांचे इंद्रधनू
भव्य निळाईत भरावे,
अभिव्यक्त होताना तू
स्वत:स विसरून जावे.....
अभिव्यक्त होताना स्व:तील असलेले न्यूनगंड विसरून, दुर्लक्षित करून मनसोक्त कलेची मांडणी करावी. यामुळे आत्मविश्वास तर वाढेलच पण न्युनगंडाची भावना हि कमी होण्यास मदत होईल. लहान मुलांची चित्र याबाबतीत परिपूर्ण असतात. त्यात रेषा, आकार,रंग प्रमाणबद्धता या गोष्टीनां महत्व नसते, ते त्या चित्रात नकळत स्व:टाचा व्यक्तिमत्व विकास सुद्धा या अभिव्यक्तीमुळे होण्यास मदत होते. आपलं विचारांचं विश्व, प्रतिमा, भवनीक जग यामुळं नक्कीच प्रगल्भ होईल, यातून सृजन नक्कीच घडेल. त्या सृजनाचा आनंद कायमस्वरूपी टिकणारा असेल. चला तर मग अभिव्यक्त होऊया.........!!!
- शशिकांत बा. कुपटे, सहशिक्षक
आद्य क्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल