'शिक्षणविवेक'चा वर्धापनदिन उत्साहात

शिक्षण विवेक    09-Aug-2021
Total Views |
 

shikshanvivekcha vardhapa'शिक्षणविवेक'चा वर्धापनदिन उत्साहात
विविध शाळांमध्ये अंकाचे जोरदार स्वागत
पुणे : 'शिक्षणविवेक'चा नववा वर्धापनदिन सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. 'शिक्षणविवेक'चा वर्धापनदिन आणि क्रांतिदिनाचे (९ ऑगस्ट) औचित्य साधून विविध शाळांमध्ये 'शिक्षणविवेक'च्या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे म्हणजेच वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. काही शाळांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कार्यक्रम घेऊन तर, काही शाळांनी ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे अंकाचे प्रकाशन केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, रानडे बालक मंदिर, डीईस स्कूल, नवीन मराठी शाळा येथे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना कार्यक्रम ऑनलाइन दाखवण्यात आला. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रमदेखील घेण्यात आला. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाच्या आजीव सदस्य डॉ. सविता केळकर उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे उपस्थित होते. शिक्षणविवेकच्या अंकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. शिक्षणविवेकचे उपसंपादक मयूर भावे आणि राधिका परांजपेदेखील या वेळी उपस्थित होते. विमलाबाई गरवारे प्रशालेतदेखील छोटेखानी स्वरूपात अंकाचे प्रकाशन झाले.
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळेने अंकाचे प्रकाशन यूट्युब चॅनलवर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि उपक्रम सहायक सायली शिगवण या वेळी उपस्थित होत्या. डॉ. कुडतरकर यांनी या वेळी 'शिक्षणविवेक'च्या अंकाची माहिती दिली आणि भूमिका मांडली.
छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या विवेकानंद संकुल सानपाडा या विद्यालयातर्फे अंकाचे ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षणविवेकमधील आपल्या आवडत्या लेखाचे किंवा कवितेचे वाचन केले. पालकांनी मनोगत मांडले आणि शिक्षणविवेकच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विवेकानंद संकुलच्या मुख्याध्यापिका ऋतूजा गवस यांनी कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले. शिक्षणविवेकचे उपसंपादक मयूर भावे यांनी अंकाच्या नऊ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेऊन पुढील उपक्रमाची माहिती दिली.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या वतीनेदेखील अंकाचे ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. शि. प्र. मंडळींची मराठी माध्यम शाळा निगडी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, भा. शि. प्र. स. चे श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन ज्ञानमंदिर हायस्कूल, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिलाश्र हायस्कूल, कर्वेनगर यांसह विविध विद्यालयांत शिक्षणविवेकच्या अंकाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे प्रकाशन सोहळा पार पडला.
शिक्षणव्यवस्थेचे अविभाज्य अंग असलेल्या शिक्षणविवेक या चळवळीच्या यशस्वी वाटचालीचे विविध संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक अशा विविध स्तरांतून कौतुक करण्यात आले. शिक्षणविवेकच्या प्रतिनिधींनी सर्वांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्द्ल धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली.