आले गणपती बाप्पा

शिक्षण विवेक    11-Sep-2021
Total Views |

ale ganpati bappa_1  
आले आले बाप्पा गणपती
काय सांगू त्यांची महती
देव गजानन घरात येती
सारी विघ्ने दूर पळती !
गणपती बाप्पाचा बघा थाटमाट
बसायला आहे चंदनाचा पाट
धूप व पुष्प सुवासाचा घमघमाट
दिव्यांचा दिसतो लखलखाट !
सकाळी, सायंकाळी आरती होते
आनंद, चैतन्य सर्वत्र दिसते
भक्ती, प्रसन्नतेने मन चिंब भिजते
लाडू, मोदक बघून तृप्तता येते !
सगळीकडे असे भक्तीचा महापूर
कानावर येती गणेशस्तुतीचे सूर
चिंता, दुःख, संकटे जाती पळून दूर
कोणी करत नाही मग कुरकुर !
असे हे बाप्पा चतुर्थीला येतात
आपल्या घरी आनंदाने राहतात
पूजा, अर्चनेने आनंदी होतात
शुभाशीर्वाद जगाला देतात !
अनंत चतुर्दशीला हुरहुर लावतात
आपल्या घरी परतायला निघतात
सारे जण मनात खूपच गहिवरतात
पुढच्या वर्षी, लवकर या म्हणतात !

विजया खालकर, शिक्षिका,
विवेकानंद संकुल, सानपाडा