भाद्रपद शुद्ध षष्ठीला गौरी आवाहन असते. महालक्ष्मी आणि गौरी हे दोन्ही उत्सव एकत्र येतात.
अनुराधा नक्षत्रावर गौरी येतात व
ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांची पूजा केली जाते. मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन केले जाते. गौरीच्या दिवशी गाणी म्हणतात. चैत्रगौरी
प्रमाणेच हा उत्सव साजरा केला जातो. या वेळी काही ठिकाणी फक्त देवीचे मुखवटे बसवितात.
काही ठिकाणी पूर्ण रूपात लक्ष्मीची स्थापना केली जाते. गौरींना शालू,भरजरी साड्या नेसविण्याची रीत आहे. विविध गोड गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रियांच्या सुग्रणपणाला वाव मिळतो. रंगीबेरंगी कापड ,पाने, फुले, वनस्पती यांची आरास केली जाते. पतीच्या रक्षणासाठी स्त्रिया हे व्रत करतात. देवीची प्रार्थना करतात. आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी हे व्रत स्त्रिया मनोभावे करतात.
भाद्रपद शुद्ध षष्ठीला
आवाहन करती गौरीला
गौरी येई घराला
आनंद होई मनाला
पूजन अर्चन गौरी, लक्ष्मीचे
सुवासिनींच्या भक्तीरुपी शक्तीचे
आरास, सजावट पानाफुलांचे
भरले ताट गोड गोड नैवेद्याचे
पूजन होई महालक्ष्मी मुखवट्यांचे
कुठे होई पूजन पूर्णरूपी लक्ष्मीचे
दर्शन होते स्त्रियांच्या कलेचे
मागणे त्या करती देवीकडे सर्वांच्या सुखसम्रुद्धी व सौभाग्याचे.
- विजया खालकर.