शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार 2022

शिक्षण विवेक    15-Sep-2021
Total Views |
शिक्षणविवेक आणि लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार 2022
 
पुरस्काराचे विभाग - भाषा, गणित, विज्ञान, कला, तंत्रज्ञान, उपक्रमशील मुख्याध्यापक, विशेष
 
केवळ पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी :
 
नामांकनासाठीचे नियम व निकष -
नामांकनासाठीचे निकष व नियम:
 
  • नामांकन पाठवणार्या शिक्षकाचे कमाल वय 45 वर्षे असावे. (दि. 1 डिसेंबर, 2021 पर्यंत)
  • जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे. ( उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कारासाठी वयाची अट नाही. )
  • किमान 5 वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.
  • नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक : दि. बुधवार 1 डिसेंबर, 2021
  • निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

नामांकन पाठवण्याचे स्वरूप:
आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे पाठवावी.

  • शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन.
  • उपक्रमासंबंधीची छायाचित्रे.
  • वरील माहिती ‘शिक्षणविवेक’, म.ए.सो. भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30 या पत्त्यावर कुरिअरद्वारे किंवा mazavasa2022@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी.
  • किंवा ही सर्व माहिती ऑनलाईन भरण्यासाठी www.shikshanvivek.com या शिक्षणविवेकच्या संकेतस्थळाला भेट देऊन तेथील लिंकवरील गुगल फॉर्म भरावा. (https://forms.gle/BWLDseYYyZBFxe3e6 ) फॉर्म भरल्यानंतर खालील संपर्क क्रमांकावर मेसेज करावा.
 
पुरस्काराचे स्वरूप :
रु. 5000/- रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह
 
संपर्क : 7045781685, 9112257774
 
सदर माहिती आपल्या परिसरातील शिक्षकांना पाठवून प्रचार व प्रसार करावा.