टी.व्ही.ची गोष्ट

शिक्षण विवेक    24-Sep-2021
Total Views |

tv chi goshta_1 &nbs
 
आज वेदांग जाम खुश होता. त्याच्या बाबांनी जुना बोअरिंग टी.व्ही. देऊन टाकून नवीन स्मार्ट टी.व्ही. घेतला होता. त्यातच त्याचा आवडता राजूदादा ऑफिसच्या कामानिमित्त बंगलोरहून त्यांच्याकडे राहायला आला होता.
मेकॅनिक टी.व्ही. चालू करून देऊन गेला. वेदांगने चॅनेल सर्फ करायला सुरुवात केली. आणि त्याला लॉटरीच लागली. टी.व्ही. वर तारे जमीं पर’ सिनेमा सुरु होता. तो त्याचा अत्यंत आवडता सिनेमा होता. त्यातील बम बम बोले’ गाणे बघतांना त्याला खूप मज्जा वाटायची. चित्रकला अशी शिकवली तर काय बहार येईल! चित्रकलाच काय, सगळेच विषय असे हसत-खेळत शिकवले तर? नाहीतर आमचे गणिताचे सर, सदैव कपाळावर आठ्या आणि चेहर्‍यावर कठोर भाव. नाही म्हणायला विज्ञानाच्या मॅम चांगल्या आहेत. काही बाही नवीन सांगत असतात.
तेवढ्यात राजूदादा पण बाहेरून आला. अरे व्वा! तारे जमीं पर? माय ऑल टाईम फेवरिट मुव्ही!तो म्हणाला. अन् वेदांगसोबत तो पण टी.व्ही. बघत बसला. सिनेमामध्ये आमीरखानला भेटायला ईशानचे आई-वडील आलेले असतात. आमीरखान त्यांना त्याच्या (ईशानच्या) वह्या दाखवत असतो. त्यातल्या एका वहीत त्याने कार्टून काढलेले असते. वहीची पाने भर्रकन उलटली की ते कार्टून चालतांना दिसते. ईशान आई-वडिलांपासून दूर जातोय असे ते दृश्य असते. वेदांग ते बघून राजूदादाला म्हणाला, हॅ! काही पण दाखवतात सिनेमामध्ये. असं कसं होईल? राजूदादा त्यावर हसला आणि म्हणाला, का नाही होणार? आणि चित्रपटात हेच तर तंत्र वापरलेलं असतं. दृष्टीसातत्य म्हणतात त्याला. वेदांगने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले.
काय म्हणालास, दृष्टीसातत्य? कायअसतं ते? आणि टी. व्ही.त कसं वापरतात? ए दादा, सांग ना सगळं. आणि टी.व्ही.चा शोध कसा, केव्हा लागला याबद्दल पण सांग, तू इंजिनिअर आहेस ना! तुला सगळं माहिती असेलच ना? त्याच्या या प्रश्नांच्या सरबत्तीने राजूदादाला हसायला आले. तो म्हणाला, अरे हो! हो! किती प्रश्न एकदम विचारशील? ऐक, मी तुला सगळं क्रमवार सांगतो, ओके?
त्याने असे म्हणताच वेदांग टी. व्ही.ची गोष्ट ऐकायला सरसावून बसला. बघ,आधी आपण दृष्टीसातत्य म्हणजे काय ते बघू या. आपल्या डोळ्यांचा जो पडदा म्हणजे ठरींळपर असतो त्यावर आपल्या डोळ्यासमोर जी वस्तू असते तिची प्रतिमा तयार होते आणि ती 1/16 सेकंदापर्यंत रहाते. ती वस्तू डोळ्यासमोरून हलवली आणि ती प्रतिमा पुसायच्या आत आपण दुसरी वस्तू ठेवली तर पुन्हा दुसरी प्रतिमा तयार होते आणि आपल्याला ती वस्तू सतत हलतांना दिसते. जसं, उदबत्ती वेगात फिरवली की आपल्याला प्रकाशाचे वेगळे ठिपके न दिसता, प्रकाशाचे एकसंध स्वरूप दिसते. हेच आहे दृष्टीसातत्य. राजू दादा त्याला सामजावून सांगू लागला. हं, मला दृष्टी सातत्य कळलं. अजून सांग ना. वेदांग म्हणाला.
राजू दादाला वेदांगचा उत्साह बघून कौतुक वाटले आणि तो पुढे सांगू लागला, दूरदर्शनच्या तंत्रज्ञानात मानवी मेंदूच्या दोन क्षमता वापरल्या जातात. एक म्हणजे दृष्टी सातत्य आणि दुसरी म्हणजे अनेक चौकोनी ठिपक्यांपासून बनलेली आकृती दुरून बघितली की तिचा एकत्रित परिणाम म्हणून अखंड चित्र दिसतं. आपण मोबाईलचा कॅमेरा बघताना पिक्सेल शब्द वापरतो ना? ते हेच चौकोनी ठिपके. अच्छा! अस्सं आहे होय? मस्तच हं! वेदांग म्हणाला. बरं,ींशश्रर्शींळीळेप चा अर्थ काय? आणि याचा शोध कोणी लावला? त्याने दादाला विचारले. दादा सांगू लागला. ओके. ींशश्रश हा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ होतो दूरचे आणि र्ींळीळेप हा लॅटीन शब्द आहे. त्याचा अर्थ आहे दृश्य. अर्थात ींशश्रर्शींळीळेप म्हणजे दूरचे दृश्य. याचा शोध म्हणशील तर पॉल निकोवने 1884 मध्ये प्रथम तबकडीच्या माध्यमातून दाखविले की प्रतिमा प्रवास करू शकते. याच तंत्रावर जॉन लोगी बेअर्ड या शास्त्रज्ञाने 1926 मध्ये लंडन येथे पहिले दूरदर्शित प्रकाशचित्र प्रसारित केले. समजलं? राजूदादाने त्याला सांगितले.
वेदांग राजूदादाच्या माहितीवर एकदम खुश झाला. व्वा! राजूदादा! काय छान माहिती दिलीस. आता मी उद्या सायन्सच्या तासाला ही माहिती सांगून सगळ्यांवर इंप्रेशन मारणार बरं का! तो म्हणाला. यावर राजूदादाला गंमतच वाटली आणि दोघांनीही एकमेकांना डोळे मिचकावत टाळी दिली. आणि दोघेही खळखळून हसले. तेवढ्यात टी.व्ही.चा ब्रेकपण संपला होता. पुन्हा दोघेही सिनेमा बघण्यात मग्न झाले.
- शरयू श्रीगडीवार